mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अटाळी येथे महाराजस्व समाधान शिबिरात ३०० लाभार्थ्यांना थेट लाभ : 300 beneficiaries directly benefit from Maharajswa Samadhan Camp in Atali

शेअर करा :

300 beneficiaries directly benefit from Maharajswa Samadhan Camp in Atali : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी अटाळी येथे घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

300 beneficiaries directly benefit from Maharajswa Samadhan Camp in Atali


खामगाव : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी अटाळी येथे घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या शिबिरात सुमारे ३०० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अटाळीचे उपसरपंच तौसिफ अहमद देशमुख होते. खामगावचे तहसीलदार सुनील पाटील, गट विकास अधिकारी चंदनसिंह राजपूत, जे.एस. शिंदे, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, राजेश दीक्षित, नितीन देशमुख, शिवाजी भरगडे, मोहन भारसाकळे, इतवारे यांची उपस्थिती होती.
एकाच छताखाली योजनांची माहिती
प्रास्ताविक करताना मंडळ अधिकारी संतोष काळबाघे यांनी विविध विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची आणि शिबिराच्या उद्देशाची सविस्तर माहिती दिली. या शिबिरामुळे नागरिकांना तहसील कार्यालय किंवा इतर शासकीय कार्यालयांमध्ये चकरा मारण्यापासून दिलासा मिळाला.
७० दाखल्यांचे प्रातिनिधिक वाटप मान्यवरांच्या हस्ते विविध दाखले व लाभांचे वाटप करण्यात आले.
* उत्पन्न व जातीचे दाखले
* अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल)
* आभा कार्ड व बेबी किट
* विशेष अर्थसहाय्य योजना मंजुरी आदेश
* ७/१२ आणि ८अ उतारे
अशा प्रातिनिधिक स्वरूपात ७० दाखल्यांचे वितरण करण्यात आले, तर संपूर्ण शिबिरात ३०० हून अधिक नागरिकांनी विविध सेवांचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दीक्षित यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अटाळी, आवार, अडगाव, वझर, लाखनवाडा मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि सीएससी (सेतू) केंद्र चालकांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top