mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

राहुल गांधी व काँग्रेसच्या खासदारांविरुद्ध तीव्र निषेध आंदोलन : Intense Protest Against Rahul Gandhi and Congress MPs

शेअर करा :

Intense Protest Against Rahul Gandhi and Congress MPs : राहुल गांधी व काँग्रेसच्या खासदारांविरुद्ध तीव्र निषेध आंदोलन.

Intense Protest Against Rahul Gandhi and Congress MPs बुलढाणा, १५ मार्च २०२६: भारतीय जनता पार्टी (भाजपा) बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संसदेचा अवमान करणाऱ्या काँग्रेस पक्ष आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त केला. १२ मार्च २०२६ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसद परिसरातील मकर द्वाराजवळ राहुल गांधी व विरोधी पक्षांच्या खासदारांनी केलेल्या ‘चहा-बिस्किट पार्टी’ला पिकनिक स्पॉट बनवण्याचा प्रकार म्हणून भाजपाने तीव्र टीका केली.

भाजपा जिल्हाध्यक्ष मा. आ. विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, शहराध्यक्ष तथा SIR बुलढाणा विधानसभा प्रमुख मंदार बाहेकर, बुलढाणा तालुका अध्यक्ष सतीश पाटील, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर उबरहंडे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा सचिव डॉ. मधुसूदन सावळे, मुन्ना बेंडवाल, कि.मो. कार्यकारणी सदस्य दीपक वारे, जिल्हा उपाध्यक्ष विलास मानवतकर, अण्णा पवार, VJNT सेल जिल्हाध्यक्ष योगेश राजपूत, माजी सैनिक सेलचे अभिमन्यू करपे, अशोक किलबिले, शासकीय योजना प्रचार व प्रसार जिल्हाध्यक्ष अंबादास घेवंदे, शहर उपाध्यक्ष प्रवीण महाजन, महिला मोर्चा शहराध्यक्ष वर्षाताई पाथरकर, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष उषाताई पवार, शहर महामंत्री अजित गुळवे, किरण नाईक, अ.मो. शहराध्यक्ष मोहम्मद अकील, नितीन बेंडवाल, सारंगधर एकडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतीक गायकवाड, गजानन सोनुने, अनिल वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या भारतीय संसदेत माननीय लोकसभा अध्यक्षांच्या स्पष्ट मनाई असतानाही विरोधकांनी मकर प्रवेशद्वाराजवळ बसून आंदोलन केले व चहा-बिस्किटचा आनंद घेतला. हे संसदीय नियमांचा थेट अवमान असून, संसदेची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचा प्रयत्न आहे. देशात घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई असल्याचा खोटा प्रचार करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोपही करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला ऊर्जा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगताना, अशा दिशाभूल करणाऱ्या आणि संसदेचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना जनता कधीही माफ करणार नाही, असा इशारा भाजपा नेत्यांनी दिला व तीव्र निषेध नोंदवला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top