Sada Vijay Rally awakens patriotic spirit : प्रत्येक भारतीयाला देश आणि तिरंगा राष्ट्रध्वजाबद्दल मोठा आदर व अभिमान आहे. भारतीय सैनिकांबद्दलही तितकेच प्रेम आणि गौरवाची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. कुठल्याही राष्ट्रीय कार्यामध्ये नागरिक स्वाभिमानाने पुढाकार घेतात. राष्ट्रभक्तीची ही मिसाल नुकतीच धाड येथे पहायला मिळाली.

सदा विजय रॅलीने देशभक्तीची प्रेरणा जागृत
धाड येथे सैनिकांचे जोरदार स्वागत
बबलू वाघुर्डे
धाड : प्रत्येक भारतीयाला देश आणि तिरंगा राष्ट्रध्वजाबद्दल मोठा आदर व अभिमान आहे. भारतीय सैनिकांबद्दलही तितकेच प्रेम आणि गौरवाची भावना प्रत्येकाच्या मनात आहे. कुठल्याही राष्ट्रीय कार्यामध्ये नागरिक स्वाभिमानाने पुढाकार घेतात. राष्ट्रभक्तीची ही मिसाल नुकतीच धाड येथे पहायला मिळाली. सदा विजय रॅलीने देशभक्तीचे स्फुलिंग चेतविले. देशभक्त नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करून ‘ झंडा ऊँचा रहे हमारा… ‘ हा नारा बुलंद केला.
१५ जानेवारीला आर्मी दिवस उत्साहात साजरा केला जातो. १५ जानेवारीच्या पूर्वसंध्येला १४ जानेवारी २०२६ ला संध्याकाळी सदा विजय अवॉर्ड मिळाला. पंजाबमध्ये नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा ऑपरेशन राहत या युनिटचे CO कर्नल रॉबिन अंथोनी चीफ यांनी त्यांच्या अधिपत्याखालील भारतीय सैन्य दलाच्या २७० इंजिनीअर रेजिमेंटकडेे पंजाब राज्याची जबाबदारी सोपवली होती. या तुकडीने पंजाबमधील लाखो लोकांचे प्राण वाचविले. या शौर्याची दाखल घेऊन चीफ ऑफ द आर्मी satar (आर्मी ) जनरल यांच्याकडून युनिट २७० ला सदा विजय हा विषेश पुरस्कार देण्यात आला. संपूर्ण भारतातून हा पुरस्कार फक्त एकाच युनिटला दिल्या जातो. त्याचा मान या तुकडीला मिळाला. हे सैनिक २७० या युनिटची पायाभरणी करून गेले. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रभर सदा विजय रॅली काढण्यात आली आहे.
पुणे येथून १ फेब्रुवारीला मेजर जनरल अमर कोहिते व कर्नल रॉबिन्स अँथनी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात येऊन रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीत सैनिकांच्या दोन तुकड्या सहभागी झाल्या आहेत. नागपूर येथे ८ फेब्रुवारीला समारोप होणार आहे. धाड येथे रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सैनिक गणेश सरोदे यांच्याकडे मुक्कामाला राहून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकामधे २७० युनिटचे स्वागत करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी ‘ छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय बोले सो निहाल, सत श्री अकाल ‘ या गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणला. नंतर धाड पोलीस स्टेशनमध्ये स्वागत सत्कार करण्यात आला.
येथून रॅली बुद्धविहाराकडे निघाली.
या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी सैनिक व वीरनारी उपस्थित होत्या. या सर्वांनी युनिटचे जल्लोषात स्वागत केले.
वीरपत्नींचा गौरव
ज्या गावामध्ये ही रॅली गेली तेथील शहीद सैनिकांच्या वीरपत्नीचा गौरव करण्यात येत आहे. हा सन्मान पाहून अभिमानाने उपस्थित आमचे उर भरून येते. तुम्ही आणि तुमचा परिवार एकटा नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा धीर सैन्य दलाच्या तुकडीने महिलांना दिला आहे. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही आर्मीपर्यंत पोहोचवू, हा संदेशही यावेळी देण्यात येत आहे.
शाळा, मारुती ट्रस्टच्या वतीने स्वागत
विशेष म्हणजे धाडच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये भेट देऊन विद्यार्थ्यांना युनिटने चॉकलेट वितरित करून आर्मी बद्दल माहिती देण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी सैनिकांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. हनुमान मंदिर ट्रस्टला भेट देण्यात आली. येथेही शाल व श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. धाड ग्रामपंचायत, धाड पोलीस, दिव्यज्योती महिला अर्बनच्या वतीनेही स्वागत करण्यात आले. समाधान सरोदे यांच्याकडे त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तेथून रॅली नागपूरला रवाना झाले.






