Enthusiastic essay competition on the occasion of shiv jayanti in zilla parishad school : जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती निमित्त उत्साही निबंध स्पर्धा १०० विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग.

धाड : १९ फेब्रुवारी २०२६ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विशेष निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ५ वी ते ९ वी इयत्तेतील एकूण १०० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
शिवजयंती उत्सव समिती आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. कार्यक्रमात प्राचार्य ढगे सर, वाघ सर, बोर्डे सर, खेडकर सर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शिवरायांच्या जीवनातील शौर्य, नेतृत्व, गनिमी कावा, स्वराज्याची संकल्पना आणि जनकल्याणकारी कार्य याबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य स्वराज्याचे स्वप्न आणि शिवरायांचे योगदान आजच्या काळात शिवाजी महाराजांचे नेतृत्व गुण अशा विषयांवर उत्कृष्ट निबंध लिहिले. मुलांनी शिवरायांच्या धैर्य, न्यायप्रियता आणि रयतेच्या राजा म्हणून केलेल्या कार्याची भावपूर्ण माहिती आपल्या निबंधातून मांडली. शिक्षकांनी सांगितले की, ही स्पर्धा केवळ लेखनापुरती मर्यादित नव्हती, तर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा आदर, स्वाभिमान आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ झाली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, छोटी बक्षिसे आणि सन्मान देण्यात येणार आहे.

कार्यक्रमादरम्यान शाळेत शिवरायांच्या जयघोषांनी वातावरण दणाणून गेले होते. विद्यार्थी उत्साहाने म्हणाले, “शिवरायांचे जीवन वाचून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली. आम्हीही स्वतःला सक्षम, धैर्यवान आणि देशभक्त बनवू.अशी भावना विध्यार्थानी व्यक्त केली .
………………………


