mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयोवंदना कार्ड बंधनकारक : Ayushman and Vayavandana cards are mandatory for free treatment.

शेअर करा :

Ayushman and Vayavandana cards are mandatory for free treatment : मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयोवंदना कार्ड बंधनकारक.

Ayushman and Vayavandana cards are mandatory for free treatment.

 

बुलढाणा  दि. 6 : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वयो वंदना कार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांना लाभ मिळणार असून योजनेंतर्गत २  हजार ३९९  विविध आजारांवर मोफत उपचार उपलब्ध आहेत. ७०  वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी वयो वंदना कार्ड तयार करण्यात येत आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी beneficiary.nha.gov.in या पोर्टलवर जाऊन “For Senior Citizens of the age of seventy years and above CLICK HERE TO ENROLL” या लिंकवरून नोंदणी करून कार्ड तयार करता येते.

वयो वंदना कार्डसाठी आवश्यक बाबी : नागरिकाचे वय ७०  वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे, आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक.
आयुष्मान कार्डसाठी आवश्यक बाबी : अद्यावत शिधापत्रिका व १२  अंकी शिधापत्रिका क्रमांक, आधार कार्ड व आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक.

नागरिकांना सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र, आशा स्वयंसेविका तसेच रेशन दुकानदार यांच्यामार्फत आयुष्मान व वयो वंदना कार्ड तयार करून घेता येणार आहे. पात्र नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top