One killed, one injured in a high-speed black and yellow car crash : भरधाव काळी पिवळीने उडवले एक ठार एक जखमी
डोणगाव :
डोणगाव पासून जवळच वाशिम जिल्ह्याच्या हद्दीजवळ बळीराजा पेट्रोल पंपा समोर ५ मार्च सकाळी नऊ वाजता दरम्यान झालेल्या अपघातामध्ये डोणगाव येथील शरद जाधव वय ५५ वर्ष व त्यांच्यासोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाली यामध्ये शरद जाधव यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना ६ मार्च रोजी घडली.
डोणगाव पासून जवळच मेहकर मालेगाव रोडवर ५ मार्चच्या सकाळी नऊ वाजता दरम्यान शरद गणपतराव जाधव वय ५५ वर्ष हे व त्यांच्यासोबत एक व्यक्ती मालेगाव कडे जात असताना बळीराजा पेट्रोल पंपावरून मोटरसायकल मध्ये पेट्रोल भरून बाहेर निघत असताना मालेगाव कडून डोणगाव कडे येत असणारी भरधाव काळी पिवळी ने त्यांना उडवले ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला व पायाला मारा लागला अशात त्यांना मेहकर येथे खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांची तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना ६ मार्च च्या सकाळी घडली.
शरद जाधव हे डोणगाव येथील जावई होते तर मागील काही वर्षां पासून ते डोणगाव येथे स्थायिक झाले होते यापूर्वी १२ ऑक्टोंबर २०२५ ला डोणगाव येथील अतिया पेट्रोल पंपा समोर त्यांचा व जाकीर शाह मिस्त्री यांचा अपघात झाला होता या अपघातामध्ये जाकीर शाह मिस्त्री यांचा मृत्यू झाला होता तर शरद जाधव यांचे दोन्ही पाय मोडले होते अशातच मागील पंधरा ते वीस दिवसांपासून त्यांना कसेतरी चालता येत होते अशातच ५ मार्च रोजी झालेला अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला एका जीवघेण्या अपघातातून वाचले तर दुसऱ्या अपघातात त्यांना मृत्यूने गाठले त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा दोन मुली असा पारिवार आहे.


