mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पहिल्यांदा वाचले, दुसऱ्यावेळी प्राण घेतले : Saved the first time, killed the second time

शेअर करा :

Saved the first time, killed the second time : सासुरवाडी असल्याने युवा वर्गच काय ग्रामस्थ शरद जाधव यांना प्रेमाने दाजीबा म्हणायचे. मात्र, सुस्वभावी असलेल्या दाजीबा यांचा पाच महिन्यांपूर्वी अपघात झाला. त्यातून ते वाचले. मात्र, नियतीने त्यांना दुसऱ्या अपघातात सर्वांपासून हिरावून नेले.

Saved the first time, killed the second time

गावचे शरद दाजींचा अपघाती मृत्यू : काळीपिवळीने उडवले

मेहकर : सासुरवाडी असल्याने युवा वर्गच काय ग्रामस्थ शरद जाधव यांना प्रेमाने दाजीबा म्हणायचे. मात्र, सुस्वभावी असलेल्या दाजीबा यांचा पाच महिन्यांपूर्वी अपघात झाला. त्यातून ते वाचले. मात्र, नियतीने त्यांना दुसऱ्या अपघातात सर्वांपासून हिरावून नेले. भरधाव काळीपिवळी टॅक्सीने उडविल्यामुळे जाधव यांचा मृत्यू झाला.

डोणगावपासून जवळच वाशीम जिल्ह्याच्या हद्दीजवळ बळीराजा पेट्रोल पंपासमोर ५ मार्च सकाळी नऊ वाजता हा अपघात घडला. डोणगाव येथील शरद गणपतराव जाधव (वय ५५) व त्यांच्यासोबत असलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. डोणगावपासून जवळच मेहकर ते मालेगाव रोडवर ५ मार्चच्या सकाळी नऊ वाजता शरद  जाधव मालेगावकडे जात असताना बळीराजा पेट्रोल पंपावरून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर निघत असताना मालेगावकडून डोणगावकडे येत असलेल्या भरधाव काळीपिवळीने त्यांना उडवले. यात ते गंभीर जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


शरद जाधव हे डोणगाव येथील जावई होते. मागील काही वर्षांपासून ते डोणगाव येथे स्थायिक झाले होते. यापूर्वी १२ ऑक्टोंबर २०२५ ला डोणगाव येथील अतिया पेट्रोल पंपासमोर त्यांचा व जाकीर शाह मिस्त्री यांचा अपघात झाला. होता या अपघातामध्ये जाकीर शाह मिस्त्री यांचा मृत्यू झाला. तर शरद जाधव यांचे दोन्ही पाय मोडले होते. अशातच मागील पंधरा ते वीस दिवसांपासून त्यांना कसेतरी चालता येत होते. अशातच ५ मार्च रोजी झालेला अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. एका जीवघेण्या अपघातातून वाचले तर दुसऱ्या अपघातात त्यांना मृत्यूने गाठले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top