A family went to open the door every day, but their information was leaked : हबीबच्या घरची मंडळी ६ मार्चच्या सायंकाळी रोजा सोडवण्यासाठी थांबले होते. तेवढ्यात त्याच्या मृत्यूची बातमी धडकली आणि आनंदाचा क्षण दुःखात बदलला.

मेहकर : हबीबच्या घरची मंडळी ६ मार्चच्या सायंकाळी रोजा सोडवण्यासाठी थांबले होते. तेवढ्यात त्याच्या मृत्यूची बातमी धडकली आणि आनंदाचा क्षण दुःखात बदलला. लाइनचे खासगी काम करणारा हबीब खांबावर करंट लागल्याने कोसळून तर झाला.
मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे सहा मार्चच्या संध्याकाळी साडेसहा वाजेदरम्यान शेख हबीब शेख कालू (वय ३०) हा शेलगाव देशमुख येथील एका व्यक्तीच्या विजेच्या समस्येचे काम करीत होता. यावेळी करंट लागून तो जमिनीवर कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीजवळ अंत्यसंस्कार झाले.


