mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

पोलिसाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या : Policeman commits suicide by jumping into well

शेअर करा :

Policeman commits suicide by jumping into well : पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस हवालदार पंजाबराव शेळके यांनी बाभूळखेड शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

Policeman commits suicide by jumping into well


बुलढाणा हेडक्वार्टरला होते कार्यरत

मेहकर : तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवासी असलेले ५६ वर्षीय पोलीस हवालदार पंजाबराव शेळके यांनी बाभूळखेड शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ८ मार्च सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस आली.
बुलढाणा हेडक्वार्टर येथे कार्यरत असलेले पंजाबराव भीमराव शेळके यांनी बाभूळखेड शिवारात असलेल्या लाड यांच्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी, पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.  पोलीस विभागामध्ये त्यांच्या आत्महत्येने हळहळ व्यक्त होत आहे.

जे पोलीस इतरांच्या आत्महत्येचा पंचनामा करतात, त्याच पोलिसांना आपल्या सहकाऱ्याचा पंचनामा करावा लागला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top