Guidance on HPV vaccination on Womens Day : जागतिक महिला दिन देशातील महिला सशक्त व रोगमुक्त असाव्या, यासाठी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गर्भाशय मुख कर्करोगाचे निर्मूलन करण्यासाठी एसपीव्ही लसीकरण आवश्यक असल्याची गरज व्यक्त करण्यात आली.

डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांमधील गर्भाशय मुख कर्करोगसंबंधी मार्गदर्शन
डोणगाव : जागतिक महिला दिन देशातील महिला सशक्त व रोगमुक्त असाव्या, यासाठी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गर्भाशय मुख कर्करोगाचे निर्मूलन करण्यासाठी एसपीव्ही लसीकरण आवश्यक असल्याची गरज व्यक्त करण्यात आली. याबाबत १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना लसीकरणाबाबत जागृती करण्यात आली.
जागतिक महिला दिनी कर्तृत्वान महिलांचे गुणगान व महिलांच्या सर्वांगीण विकास व महिलांचे आरोग्य याविषयी चिंतन करण्यात येते. मेहकर तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या डोणगाव येथील केंद्रामध्ये ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. महिलांमध्ये होणारे गर्भाशयाचे कर्करोग या विषयावर सखोल माहिती देण्यात आली. या कर्करोगापासून वाचण्यासाठी शासनाने १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पर्यवेक्षिका कमल पदमने यांनी आशा सेविका व आरोग्य सेविका व मुलींना संबोधित करताना सांगितले की, या लसीकरणामुळे ज्याप्रमाणे पोलिओचे निर्मूलन झाले, त्याप्रमाणे गर्भाशय मुखाचा कॅन्सरसुद्धा होणार नाही. यासाठी शासनाने हा उपक्रम राबवलेला आहे. पहिल्या टप्प्यात दोन गाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४ ते १५ वयोगटातील ६५८ मुलींना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये. कर्करोग हा महाभयंकर रोग असून त्यापासून आपले व आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे यासाठी हे लसीकरण करणे गरजेचे आहे.
जागतिक महिला दिनाच्या अवचित्यावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आरोग्य सेवक मिटकरी, लाकडे, आरोग्य सेविका शीला झगडे, रेखा सुर्वे, अनिता मोळेदे, संगीता खोडके यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.


