mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

 म्हसला विभागात छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर उत्साहात : Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Satisfaction Camp in full swing in Mhasala division

शेअर करा :

Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Satisfaction Camp in full swing in Mhasala division : म्हसला महसूल विभागात जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Satisfaction Camp in full swing in Mhasala division Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Satisfaction Camp in full swing in Mhasala division

म्हसला बुद्रूक : म्हसला महसूल विभागात जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

कृषी विभागाच्या योजनांविषयी माहिती देताना धाड येथील मंडळ कृषी अधिकारी सचिन चेके यांनी फळबाग लागवड योजनेबाबत मार्गदर्शन केले. एमआरईजीएस (MGNREGA) अंतर्गत तसेच जॉब कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. याचवेळी पुरवठा निरीक्षक यांनी रेशन कार्डाशी संबंधित विविध सेवांबाबत माहिती दिली. तसेच विविध लोकप्रतिनिधींच्या हस्ते नागरिकांना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले. शेतकरी आत्महत्या प्रकरणातील पात्र शेतकऱ्यांच्या पत्नींनाही प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधासाठी भाऊसाहेब फुंडकर शासकीय महाविद्यालय येथील टीम शक्तीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या वेळी सहाय्यक प्रा.डॉ. पूनम मडावी व डॉ. सुरेश खरात उपस्थित होते.

शासनाचा खरा उद्देश म्हणजे खेड्यातील नागरिकांना महसुली सेवा, आरोग्य सेवा, कृषी सेवा आदी सेवा शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व खर्च दोन्ही वाचत असल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी नायब तहसीलदार अनंता पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरा मागील शासनाचा उद्देश स्पष्ट केला. या शिबिरात आधार केंद्र, सेतू केंद्र, कृषी विभाग, आरोग्य विभाग, संजय गांधी निराधार योजना आदी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी तहसीलदार विठ्ठल कुमरे व नायब तहसीलदार सुनील अहिर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top