mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बांधकाम कामगारांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा : Positive discussion on the problems of construction workers

शेअर करा :

Positive discussion on the problems of construction workers : बांधकाम कामगारांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा.

बुलढाणा : जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी बांधकाम कामगार अधिकारी शैलेश देशमुख यांच्यासोबत शासकीय योजना प्रचार प्रसार समितीचे भाजपा जिल्हाध्यक्ष  अंबादास घेवंदे  यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण चर्चासत्र पार पडले.
या बैठकीत बांधकाम कामगारांच्या क्लेम लवकर मिळावेत, नवीन नोंदणी तसेच नूतनीकरणाची प्रक्रिया त्वरित पूर्ण व्हावी यासह कामगारांच्या इतर अनेक समस्या मांडण्यात आल्या. कामगारांच्या सध्याच्या सर्व प्रश्न ताबडतोब निकाली काढण्याचे आश्वासन  शैलेश देशमुख यांनी दिले. त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे स्पष्ट केले.
यावेळी शासकीय योजना प्रचार आणि प्रसार समितीचे जिल्हाध्यक्ष अंबादास घेवंदे , बुलढाणा तालुका अध्यक्ष माणिकराव नरोटे पाटील, अन्वर शहा, अमोल जाधव, विकास पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
ही बैठक बांधकाम कामगारांच्या हक्क आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरली असून, शासन आणि कामगार संघटनांच्या माध्यमातून समस्या जलद सोडवण्याची दिशा मिळाली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top