mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

सैलानी यात्रेत वृद्धाचा मृत्यू : Elderly man dies during tourist trip

शेअर करा :

Elderly man dies during tourist trip : सैलानी यात्रेत वृद्धाचा मृत्यू.

Elderly man dies during tourist trip

बुलढाणा : 
सैलानी बाबांच्या दर्शनासाठी सैलानीत आलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. ७ मार्चला सकाळी ११ वाजता त्यास बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तो मृत झाला होता.
सैलानी येथून एक अनोळखी इसम  वय अंदाजे ८० वर्षे  यास ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून त्याचा मृतदेह सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे. मृत व्यक्तीजवळ कोणतीही ओळख पटविणारी कागदपत्रे किंवा नातेवाइक नसल्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी तसेच नातेवाइक, मित्रमंडळी किंवा परिचित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ८० वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व पिवळ्या रंगाची टी-शर्ट, पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. उजव्या हातात लाल रंगाचा धागा असून कमरेला पंचरंगी दोरा आहे.  सदर व्यक्तीची ओळख पटल्यास किंवा त्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास बुलढाणा पोलीस ठाणे येथे किंवा मोबाइल क्रमांक ९६२३२४३७३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोहेकॉ नरेंद्र रोटे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top