Home Minister Khel Paithani program receives enthusiastic response in Dongaon :



नव्या युगाची रणरागिणी उंबरठा ओलांडून अथांग क्षितिजाकडे : सायली सावजी
डोणगाव : जागतिक महिला दिनानिमित्त सुबोध युवक कल्याण मंडळ, विठ्ठल रुखमाई शिक्षण प्रसारक संस्था व सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या भरगच्च कार्यक्रमात नव्या युगाची रणरागिणीचे उंबरठा ओलांडून अथांग क्षितिजाकडे पाऊल पडत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती तथा आयोजक सायली सावजी यांनी केले.

















यावेळी माजी मंत्री सुबोध सावजी, सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष डॉ. राहुल सावजी, लोणार नगर परिषदेच्या अध्यक्षा मीराताई मापारी यांची विशेष उपस्थिती होती.
डोणगावनगरीमध्ये प्रथमच विठ्ठल रुखमाई विद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील महिला, युवतींनी आपला सहभाग नोंदवून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. संदीप देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला नगरसेविका निलीमा सोमन, रुपाली गारोळे, सुनिता ढाकरके, दीपिका राहाटे, ॲड. जयश्री राखुंडे, माजी सभापती वनिता खोडके, सरपंच किरण आखरे, वर्षा काळे, अश्विनी आखाडे, माजी सरपंच कुसुम आखाडे, रेखाताई पांडव, अनुराधा धांडे, डॉ. संगीता धाडकर, वैशाली आंबेकर, डॉ. प्रांजली बाजड, सामाजिक कार्यकर्त्या वंदना दादंडे, ज्योती बुरखंडे मीना आढाव, माधुरी फुले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या. आयोजकांच्या वतिने भेटवस्तू, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.
नारीशक्तीचा एक आगळावेगळा विरुंगळ्याचा, पण कौशल्याचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रथमच आयोजित झाल्यामुळे ग्रामीण भागातील महिला भगिनींसह स्थानिक महिलांचा उत्साह दिसून आला. स्पर्धात्मक कार्यक्रमात अनेक महिला भगिनींना सहभागी घेऊन आपला आनंद द्विगुणित केला.
स्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये सुमन राजू वाठोरे, मनीषा पंकज खोडके, अश्विनी रमेश आनकर, कल्पना शंकर सरकटे, सारिका रिंकेश काळे यांनी आकर्षक बक्षिसे पटकावून पैठणीच्या हकदार झाल्या तर आयोजकांनी प्रोत्साहनपर स्वाती अमीत मुंढे, कल्पना ज्ञानेश्वर आमले, कविता प्रशांत बुरखंडे, कल्याणी अमर सराफ, सुरेखा प्रशांत देशमुख, मनीषा काळे, जान्हवी विश्वेष सराफ, वंदना सुमीत आंबेकर, जयश्री वसंत कळासरे, स्वाती नंदकुमार महाजन यांना पैठणी देऊन सन्मानित केले.
होम मिनिस्टर कार्यक्रम यशस्वितेसाठी सायली शैलेश सावजी, डॉ. स्मृती सावजी, शीतल इंगळे, प्रियंका सदार, सविता आमले, सिंधु खोडके, साक्षी आंबेकर, आशा पांडव, वैशाली पळसकर, स्वाती आनकर, राजश्री वाघ, प्रतिभा आखाडे, मीरा बाजड, शीतल इंगळे या महिलांनी परिश्रम घेतले.


