Sword in car; Youth arrested : आर्म ॲक्टचे उल्लंघन करून कारमध्ये तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी देऊळगाव राजा येथील जनता जिनिंगसमोर नाकाबंदीदरम्यान ९ मार्च रोजी पकडले.

बुलढाणा : आर्म ॲक्टचे उल्लंघन करून कारमध्ये तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी देऊळगाव राजा येथील जनता जिनिंगसमोर नाकाबंदीदरम्यान ९ मार्च रोजी पकडले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळगाव राजा येथे नाकाबंदी केली. यावेळी आरोपी राहूल भास्कर झोरे (वय ३३, रा. माळीपुरा, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा) हा एमएच-१२-जीएफ-८०६७ क्रमांकाच्या कारमध्ये गुप्ती तलवार बाळगून असल्याचे आढळले. आरोपीविरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ठिकठिकाणी जुगाऱ्यांवर कारवाई
तामगाव पोलीस स्टेशन हद्दीत दोन व लोणारमध्ये एक जुगार कारवाई करण्यात आली. पातुर्डा येथील मच्छी मार्केटमध्ये तितली भवरा जुगारावर छापा मारून आरोपी भीमराव श्रावण खंडेराव (वय ५५, रा. पातुर्डा खुर्द ता. संग्रामपूर) यास पकडण्यात आले. पातुर्डा आठवडी बाजारात वरली मटका जुगार चालविणाऱ्या बाळकृष्ण सोनाजी भानगे (वय ५०, रा. पातुर्डा ता. संग्रामपूर) यास अटक करण्यात आली. लोणार बस स्टँडजवळ वरली मटका जुगारावर कारवाई करून आरोपी अलियार खान बशारत खान (वय ४२, रा. आझादनगर लोणार) यास पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशान्वये व अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पीएसआय पंकज सपकाळे, प्रताप बाजड, राजेंद्र अंभोरे, ओमप्रकाश सावळे, शरद गिरी, एजाज खान, पुरुषोत्तम आघाव, अमोल शेजोळ, दीपक वायाळ, अजिस परसुवाले, मनोज खरडे, नीलेश राजपूत, पूजा जाधव यांच्या पथकाने या कारवाया केल्या.
………………………………………..
ADVT

प्रिय पालकांनो,
10वी ते 11वी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. Science (PCMB) मध्ये जाण्यापूर्वी Physics, Chemistry, Biology व Maths चे basic concepts strong असणे आवश्यक असते.
यासाठी PAHEL Institute, Buldhana येथे
Bridge Course for NEET | JEE | MHT-CET
📅 Starting 18 March
या course मध्ये PCMB basic concept clearance, foundation building, daily tests, workbook practice व close monitoring दिले जाईल.
या वर्षी Avanti Learning Centre, Mumbai चे IITian teachers JEE (Main + Advanced) lectures conduct करणार आहेत.
Online education बद्दल एक विचार करा —
विद्यार्थी 3–4 तास mobile समोर concentrate करू शकतो का? Monitoring कोण करणार?
म्हणून मुलांना बाहेर पाठवण्यापूर्वी PAHEL ला एकदा भेट द्या.
आणि आपल्या नातेवाईक अथवा परिचयाच्या, ज्यांचा मुलगा मुलगी ११ वी ला जाणार आहे त्यांच्यासोबत नक्की share करा.
📍 PAHEL Institute, Chaitanya Vadi, Buldhana
📞 9763009156 / 9766924900


