Women should embrace new technologies and become entrepreneurs – Bhaiyasaheb Patil : महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उद्योजक बनावे – भैयासाहेब पाटील.

बुलढाणा : विश्व कौशल्य विकास आय टी आय संस्थेने जिजामाता प्रेक्षागार क्रीडा संकुल येथील बचत गटाच्या महिलांचा जागतीक महिला दिनी सन्मानपूर्वक पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. स्री ही जगाची उद्धारकर्ती आहे स्री सक्षम असली तर कुटूंबाची, कुटुंबाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होऊन देश सुजलाम सुफलाम होईल म्हणून स्री चा सन्मान समाजातील प्रत्येक व्यक्तीने केला पाहीजे.
सन्मान केवळ संविधानातील शब्द नसून स्त्रीच्या जगण्याची मूलभूत तत्वे आहेत. संविधानाने महिलांना अधिकार दिले, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तेव्हाच येईल जेव्हा समाज म्हणून आपण ते मान्य करू, पाळू आणि संरक्षण करू! अन्यायाविरोधात आवाज उठवणे, स्त्री च्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान करणे व समानतेसाठी संघटित होणे हेच संविधानाच्या मूल्याचे प्रत्यक्ष पालन आहे, असे मत विश्व कौशल्य आय टी आय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
हक्काचे व अधिकाराचे संरक्षण केवळ कायद्यामुळे होत नाही ते समाजाच्या सामाजिक आणि नैतिक जाणिवेमुळेच सुनिश्चित होते. संघर्ष शिवाय आज पर्यंत स्त्रीला काहीच मिळालेले नाही. हा आजवरचा इतिहास आहे, असे मत या संस्थेच्या संचालीका वैशालीताई पाटील यांनी व्यक्त केले.


