mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रक्तदानाच्या महायज्ञात २२०० पिशव्या रक्त संकलित : 2200 bags of blood collected in blood donation drive

शेअर करा :

2200 bags of blood collected in blood donation drive : राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संदीप शेळके यांच्या संकल्पनेतील रक्तदानाच्या महायज्ञाअंतर्गत २२०० पिशव्या रक्त संकलन झाले.  राज्यभरात आयोजित ७४ शिबिरांना राक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

2200 bags of blood collected in blood donation drive
2200 bags of blood collected in blood donation drive



औचित्य संदीप शेळके यांच्या वाढदिवसाचे : राज्यभरातील ७४ शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाणा : राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संदीप शेळके यांच्या संकल्पनेतील रक्तदानाच्या महायज्ञाअंतर्गत २२०० पिशव्या रक्त संकलन झाले. राज्यभरात आयोजित ७४ शिबिरांना राक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावर्षी १ फेब्रुवारी रोजी छत्रपतींची भूमी सातारा येथून रक्तदानाच्या महायज्ञानाला प्रारंभ झाला. राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या संयुक्त विद्यमाने संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण राज्यभरात ७४ ठिकाणी ही रक्तदान शिबिरे घेण्यात आली. एकाचवेळी राज्यात सर्वात जास्त रक्तदान शिबिरे घेण्याच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. शिबिरांमधून संकलित रक्त गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येते. दरवर्षी रक्तदात्यांकडून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यंदा महाशिवरात्रीनिमित्त डोंगरशेवली येथे आयोजित रक्तदान शिबिरात मुस्लिम बांधवांनी रक्तदानात सहभाग घेत आदर्श ठेवला. उन्हाळ्यात दरवर्षी रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवतो. बऱ्याचदा या महिन्यात आवश्यक शस्त्रक्रिया असतात. रक्तदानाची कमतरता जाणवते.  रक्तपेढी व्यवस्थापनाकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात येते. रक्तपिढीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजर्षी शाहू परिवाराच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. गर्दे वाचनालयाच्या सभागृहात १३ मार्च रोजी रक्तदान महायज्ञाचा समारोप झाला.


यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके, शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रवक्ता जयश्रीताई शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, अदिती अर्बनचे अध्यक्ष सुरेश देवकर, संजयकाका बाहेकर,
राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, विश्वजित पडोळ, शिवराज पाटील, लखन गाडेकर, विजय इतवारे, मनोज दांडगे, सोनू डोंगरे, डॉ. शरद काळे, साहेबराव डोंगरे, गजानन उबरहंडे, योगेश राजपूत, गणेशसिंग राजपूत, पत्रकार अनिल म्हस्के, राजेंद्र काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संचालन गोविंद येवले यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top