mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाई; खामगाव तहसीलदारांचा इशारा : Action will be taken if domestic gas is used commercially

शेअर करा :

Action will be taken if domestic gas is used commercially : हॉटेल, ढाबे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर ‘जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५’ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी एका दिला आहे.

Action will be taken if domestic gas is used commercially



दक्षता पथकाद्वारे गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपांची होणार तपासणी; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

खामगाव : शहरासह तालुक्यातील हॉटेल, ढाबे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर ‘जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५’ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहर व तालुक्यातील सर्व गॅस एजन्सी, पेट्रोल पंप चालक, तसेच सर्व हॉटेल, उपहारगृह, ढाबा मालक आणि मंगल कार्यालय चालकांना प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅसचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून, असे आढळल्यास प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील.
दक्षता पथकाची करडी नजर
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार, खामगाव तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली विशेष दक्षता पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक तालुक्यातील गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करणार आहे. या तपासणी दरम्यान कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा साठेबाजी आढळल्यास संबंधित मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

पुरवठा सुरळीत; अफवांकडे दुर्लक्ष करा
सध्या तालुक्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्यांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही तहसीलदार सुनील पाटील आणि निरीक्षण अधिकारी रोशनी फुलझले यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top