mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बुलढाण्यात २० मार्चला ‘जिल्हास्तरीय कन्या क्रीडा महोत्सव’चे आयोजन : District-Level Girls’ Sports Festival to be Organized in Buldhana on March 20.

शेअर करा :

District-Level Girls’ Sports Festival to be Organized in Buldhana on March 20. : बुलढाण्यात २० मार्चला ‘जिल्हास्तरीय कन्या क्रीडा महोत्सव’चे आयोजन.

District-Level Girls' Sports Festival to be Organized in Buldhana on March 20.

बुलढाणा, दि. १६ – केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील किशोरवयीन मुलींना क्रीडा क्षेत्रात प्रतिभा दाखवण्याची संधी देण्यासाठी जिल्हास्तरीय कन्या क्रीडा महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा महिला व बालविकास कार्यालय आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने २० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे हा महोत्सव रंगणार आहे.

या महोत्सवात १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील (वय १२ ते १८ वर्षे) मुलींसाठी विविध मैदानी, वैयक्तिक आणि सांघिक खेळांची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धांची यादी खालीलप्रमाणे:

मैदानी खेळ : १०० मीटर धाव, २०० मीटर धाव, लांब उडी

वैयक्तिक खेळ : बॅडमिंटन, बुद्धीबळ

सांघिक खेळ : कबड्डी

खेळाडूंची पात्रता ठरविण्यासाठी जन्मतारीख शालेय जन्म दाखल्याच्या निकषानुसार तपासली जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी (करंडक) आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील मुलींना आपली शारीरिक व मानसिक क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त किशोरवयीन मुलींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा आणि शाळांनी आपल्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top