mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

कृत्रिम जलसंकटाचा धोका वाढला : The risk of an artificial water crisis has increased.

शेअर करा :

The risk of an artificial water crisis has increased. : कृत्रिम जलसंकटाचा धोका वाढला.

The risk of an artificial water crisis has increased

बुलढाणा, दि. २४ : अकोला परिमंडळातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांवर तब्बल १५९ कोटी ८५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असून, यामुळे नागरिकांसमोर कृत्रिम जलसंकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

थकबाकी वसुलीसाठी महावितरणने कठोर भूमिका घेतली असून, वीज बिल न भरणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सांगितले की, मार्च महिन्याचे आर्थिक महत्त्व लक्षात घेता संबंधित विभागांनी तातडीने थकबाकी भरावी, अन्यथा पाणी टंचाईसारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

महावितरणकडून वारंवार पत्रव्यवहार, स्मरणपत्रे, प्रत्यक्ष भेटी आणि मोबाईल संदेशांद्वारे वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आता वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई अपरिहार्य ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परिमंडळातील एकूण २,६८६ नळ योजना थकबाकीदार असून,▪️ अकोला : ६९९ योजना — ३३.२५ कोटी थकीत▪️ बुलढाणा : १,४९० योजना — १०७.९१ कोटी थकीत▪️ वाशिम : ४९७ योजना — १८.६९ कोटी थकीत

आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने महावितरणने वसूली मोहिमेला वेग दिला असून, अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष भेट देऊन कारवाई करत आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top