mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

बोधगया दर्शनाहून परतलेल्या उपासकांकडून खीरदान : Offering of Kheer by Devotees Returning from a Pilgrimage to Bodh Gaya

शेअर करा :

Offering of Kheer by Devotees Returning from a Pilgrimage to Bodh Gaya : बोधगया दर्शनाहून परतलेल्या उपासकांकडून खीरदान; तक्षशिला बुद्ध विहारासाठी स्वागत गेट व सतरंजी देण्याची घोषणा

Offering of Kheer by Devotees Returning from a Pilgrimage to Bodh Gaya

बुलढाणा (प्रतिनिधी) :

सिंदखेड राजा तालुक्यातील ऐतिहासिक आडगाव राजा येथे चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिनी तक्षशिला बुद्ध विहारात धार्मिक व सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. बोधगया (बिहार) येथे दर्शन घेऊन परतलेल्या उपासक-उपासिकांच्या सन्मानार्थ खीरदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी विहारासाठी स्वागत गेट उभारून देण्याची तसेच सतरंजी (चटई) देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Offering of Kheer by Devotees Returning from a Pilgrimage to Bodh Gaya

कार्यक्रमाची सुरुवात महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करून उपस्थितांनी बौद्ध धम्माचे तत्व अंगीकारले.

बोधगया व वाराणसी येथील पवित्र स्थळांचे दर्शन घेऊन परतलेल्या आडगाव राजा येथील तीन दाम्पत्यांचा तक्षशिला बुद्ध विहार समिती व नगरवासीयांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये अशोक हिमतराव कहाळे, सौ. सत्यभामा कहाळे, नानाभाऊ दामोदर कहाळे, सौ. शोभा कहाळे, जितेंद्र पंढरीनाथ कहाळे व सौ. ज्योती कहाळे यांचा समावेश होता.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी लिंकला  टच करा https://mahadesha.com/

 

या उपासकांनी गावातील बौद्ध बांधवांसाठी पवित्र खीरदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये मोठ्या संख्येने उपासक-उपासिका सहभागी झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बाबासाहेब जाधव व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी विमल जाधव उपस्थित होते. त्यांचा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

आपल्या भाषणात बाबासाहेब जाधव यांनी गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ तक्षशिला बुद्ध विहाराच्या प्रवेशद्वारासमोर स्वागत गेट उभारण्याची घोषणा केली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी लिंक ला टच करा https://mahadesha.com/

 

कार्यक्रमाची सांगता शरणत्व गाथेने करण्यात आली. या उपक्रमामुळे आडगाव राजा येथे धार्मिक व सामाजिक जागृतीला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top