Deprived man sets fire to stove in front of district office : गॅस टंचाईविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ६ एप्रिल रोजी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. बुलढाणा, खामगाव, नांदुरा, सिंदखेडराजा व अन्य ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.


बुलढाणा, खामगावसह जिल्ह्यात धरणे आंदोलन
बुलढाणा : गॅस टंचाईविरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ६ एप्रिल रोजी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. बुलढाणा, खामगाव, नांदुरा, सिंदखेडराजा व अन्य ठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून कांदा-पोहे बनविण्यात आले. तर खामगावातही चुलीवर प्रतीकात्मक भाकरी बनवून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
बुलढाणा येथे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई रोखावी, काळाबाजार थांबवावा, २५ दिवसांनंतर गॅस सिलिंडरची अट शिथिल करावी, काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत, सरकारकडून प्रत्येक दोन किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न द्यावे, उज्जवला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलिंडर दिले, याचे ऑडिट करावे, या मागण्यांबाबत सरकारला निवेदन पाठविण्यात आले.
तीन भावंडांच्या मृत्यूने हळहळला बुलढाणा जिल्हा
गॅसच्या तुटवड्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. ‘वंचित’चे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी पाच तास उन्हात रांगेत उभे होते, त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. तसेच अमरावती येथे तरुणाचा गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी जाताना दुर्दैवी मृत्यू झाला होता, असा आरोप यावेळी करण्यात आला.
गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत, चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. हॉटेल्समध्ये चहा, नाश्त्याचे पदार्थ, इडली, डोसा, तळले जाणाऱ्या पदार्थांची विक्री बंद झाली आहे. लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, कॅटरिंगची कामे गॅस टंचाईमुळे पुढे ढकलण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे मेसमध्ये गॅस नसल्यामुळे जेवणाचे डब्बे बंद झाले आहेत. अनेक विद्यार्थी आपल्या गावाकडे परत गेल्याचे सांगत नीलेश जाधव यांनी सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला.
आंदोलनात मनोज खरात, विशाल गवई, समाधान डोंगरे, भीमराव शिरसाठ, शेषराव मोरे, विलास प्रधान, संजय खराटे, अनिल जाधव, श्रीकृष्ण खरात,रमेश खरात, अरुण खरात, गजानन खरात यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.


ही लिंक ओपन करा https://mahadesha.com/
खामगाव येथे जिल्हाध्यक्ष देवराव हिवराळे, आकाश सरदार व शांताराम पाटेखेडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक स्वरूपात चुलीवर भाकरी बनवून नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे यांना देण्यात आली. या आंदोलनात समता सैनिक दल, वंचित बहुजन महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा तसेच इतर संघटनांचे सुमारे २०० ते २५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकूणच, गॅस टंचाईमुळे निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


