mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मृतदेह पुरलेल्या विनोदच्या हत्येसाठी दिली सुपारी : Betel nut given for Vinods murder

शेअर करा :

Betel nut given for Vinods murder : मृतदेह पुरलेल्या ट्रकचालक विनोद नवलेची हत्या करण्यासाठी त्याचाच मालक सुनील जाधव याने सचिन उगले यास साडेतीन लाख रुपयांची सुपारी दिली होती.


Betel nut given for Vinods murder
उकरलेल्या कवटी, सांगाड्यासोबत पोलिस अधिकारी, कर्मचारी

पैसे, संपत्तीच्या वादातून चौघांनी केला खून : पोलीस तपासात सत्य उघड

मेहकर : मृतदेह पुरलेल्या ट्रकचालक विनोद नवलेची हत्या करण्यासाठी त्याचाच मालक सुनील जाधव याने सचिन उगले यास साडेतीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. मेहकर पोलिसांनी केलेल्या तपासात ही गंभीर बाब उघडकीस आली. सुनील जाधव व मृतक विनोद यांच्यात पैसे आणि संपत्तीचा वाद होता. यातूनच चौघांनी मिळून त्याचा गेम केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली.

मेहकर तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी असलेला विनोद आश्रूबा नवले हा गावातीलच सुनील जाधव याच्याकडे ट्रकचालक म्हणून काही दिवस कामाला होता. त्यांच्यात पैसे आणि संपत्तीचा वाद झाला होता. हा वाद एवढा विकोपाला गेला की सुनीलने त्याला जीवनातून कायमचे संपविण्याचा विडा उचलला. थंड डोक्याने विचार करून विनोदचे दृश्यम स्टाइल हत्याकांड घडविण्यात आले. सुनील जाधव याने मेहकरचा रहिवासी सचिन उगले याला साडेतीन लाख रुपयांची सुपारी दिली. सुपारी घेऊन त्याच्या हत्येचा पूर्वनियोजित कट रचण्यात आला. आधी मृतक विनोदला जामगाव शिवारातील एका टीनशेडने उभारलेल्या हॉटेलमध्ये नेऊन दारू पाजण्यात आली. या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. हॉटेलमागे खड्डा करून मृतदेह पुरण्यात आला. त्यावर सिमेंट काँक्रिटकाँक्रीटचा कोबा करण्यात आला.

तब्बल चार वर्षांनंतर हत्येचा गुन्हा उघडकीस आला. आरोपी सचिन उगले याच्या पत्नीने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर त्याचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली. 

 

मित्रांची घेतली मदत

विनोदला कायमचे संपविण्यासाठी सुनील जाधवने साडेतीन लाख रुपयांची सुपारी सचिन उगले याला दिली. या खुनाच्या कटात सचिन उगले याने त्याचे मित्र पवन घेवंदे व अंकुश बोडखे यांना सहभागी करून घेतले. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top