mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

चौघांनी घडविले विनोदचे दृश्यम कांड : Four Individuals Orchestrated Vinod’s ‘Drishyam’-style Deception

शेअर करा :

Four Individuals Orchestrated Vinod’s ‘Drishyam’-style Deception : चौघांनी घडविले विनोदचे ‘दृश्यम’कांड ट्रकचालकाच्या हत्येच्या गुन्ह्यात आणखी दोघांना अटक

Four Individuals Orchestrated Vinod's 'Drishyam'-style Deception
झालेल्या आरोपींची संख्या चार : मेहकर पोलिसांचे उल्लेखनीय तपासकार्य 

आसिफ शाह

मेहकर : सुकळी येथील विनोद आश्रूबा नवले (वय ३८) या ट्रकचालकाच्या केलेल्या दृश्यमस्टाइल हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात मेहकर पोलिसांना मोठे यश आले आहे. यापूर्वी अटकेत असलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवताच

‘दृश्यम’स्टाइल खुनाच्या घटनेत आणखी दोन आरोपींना अटक करण्यात मेहकर पोलिसांना यश आले आहे. हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.

मेहकर तालुक्यातील सुकळी येथील विनोद आश्रूबा नवले (वय ३८) हा चार वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. सुकळी येथीलच मुख्य आरोपी सुनील बाजीराव जाधव (वय २९) व मेहकर येथील सचिन ज्ञानेश्वर उगले (वय ३२) या दोघांनी त्याची हत्या केल्याचे सचिन उगलेच्या पत्नीने पोलिसांकडे व्यक्त केलेल्या संशयावरून उघडकीस आले होते. विनोदचा मृतदेह मेहकर ते मोळा मार्गावरील जामगाव शिवारात असलेल्या एका शेतातील हॉटेलमागे पुरलेला होता. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, मेहकरचे ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित धांडे, दोन शासकीय पंच घटनास्थळी दाखल झाले. २१ एप्रिल रोजी सकाळी सिमेंट कॉंक्रिट टाकून तयार केलेला खड्डा खोदण्यात आला. त्यामध्ये विनोद नवले याचा सांगाडा आढळून आला. तो विनोद नवले याचाच असल्याचे नातेवाइकांनी कपडे आणि हातील वस्तूंवरून ओळखले. या प्रकरणात मेहकर पोलिसांनी सुनील जाधव व सचिन उगले या दोघांना अटक केली.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/

पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात आणखी दोन साथीदार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी पवन रामचंद्र घेवंदे (वय २८) रा. मेहकर ह.मु. चिखली व अंकुश दत्तात्रय बोडखे (वय ३५) रा. जामगाव, ता. मेहकर या दोघांना पोलिसांनी आज अटक केली. चारही आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून विनोद नवलेची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार आलेवार करीत आहेत.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, सहायक फौजदार सुखदेव गव्हाण, पोहेकॉ प्रभाकर शिवनकर, लक्ष्मण कटक, मोहंमद परसुवाले, केशव अवचार, ईब्राहिम परसुवाले, शिवाजी चिम, आम्रपाली सरकटे, लक्ष्मी साखरे यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top