Ramesh Anna Mule Patil elected as President of the Maharashtra State Maratha Front of the RPI Athawale. : बुलडाणा जिल्हा रिपाईच्या वतीने समाजसेवक दानदाते रमेश अण्णा मुळे (पाटील) यांची रिपाइं आठवलेंच्या महाराष्ट्र प्रदेश मराठा आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार

बुलडाणा,(प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील समाजसेवक रमेश अण्णा मुळे (पाटील) यांची महाराष्ट्र राज्याच्या मराठा रिपाइं (आ) च्या प्रदेश आघाडी पदी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार तथा रिपाईचे राष्ट्रीयध्यक्ष लोकनेते डॅा. रामदासजी आठवले यांनी पक्षाच्या सोशल इंजिनेअरींगच्या भवितव्या साठी मोठा निर्णय घेतला संभाजीनगर (औरंगाबाद) चे दानसुर समाजसेवक 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारे मुळे फांडेशनच्या माध्यमातून गोरगरीब निराधार निराश्रीतांना मदतीचा हात मुळे फाउंडेशनच्या मध्यमातून महाराष्ट्रभर देणारे समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांच्याकडे मराठा आघाडीची धुरा दिल्यामुळे महाराष्ट्रात रिपाई संघटनाला नवी धार मिळाली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या हस्ते रमेश अण्णा मुळे यांची महाराष्ट्र राज्य मराठा आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती १९ एप्रिल २०२५ रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पत्रकार परिषदेत घोषणा करून नियुक्ती पत्र दिले. या नियुक्ती सोहळ्याने राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रमेश अण्णा मुळे पटील हे मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय आणि प्रभावी चेहरा म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जातात. त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून मराठा, ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने मोबाईल सेवेसारखा लढा देत आहेत. विशेषतः कोरोना काळात त्यांनी गरजवंतांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेत केंद्रीय मंत्री डॅा. रामदासजी आठवले यांनी त्यांना पक्षात प्रवेश देत मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या नियुक्तीमुळे राज्यातील सामाजिक समन्वय मराठा दलीत समन्वयामुळे मोठी संघटनात्मक ताकद निर्माण होईल डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे “शासन करती जमात बना “ मराठा दलीत मुळे अण्णांच्या नियुक्ती मुळे एकत्र येऊन रिपाईची ताकद वाढवून महाराष्ट्राचे राजकारण पूढील लोकसभा, विधानसभा या मध्ये चित्र वेगळे दिसेल जिकडे आठवले तीकडे शासन करती जमात बनेल व डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशाने रिपाईची घोषणा केली होती ते स्वप्न पूर्ण होईल. रिपाईच्या मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्द बुलडाणा जिल्हा रिपाईच्या वतीने संभाजीनगर (औरंगाबाद) येथील रिपाइंच्या जिल्हा कार्यालयात त्यांना शाल पुष्प गुच्छ पेढे वाटून त्यांचे जिल्ह्याच्या वतीने मोठ्या जल्लोषात सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशकार्याध्यक्ष बाबुरावजी कदम, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष पॅंथर बाळकृष्ण इंगळे, मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. दिलीपदादा पाडमुख,समाजभूषण भिमरत्न पुरस्कार जेष्ठनेते प्रा. इंजि. भैयासाहेब पाटील, बुलडाणा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, महीलाध्यक्ष वंदनाताई वाघ, युवाजिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील (म्हस्के), प्रसिद्ध प्रमुख वैभव शिरसाठ, विदर्भउपाध्यक्ष संजय वाकोडे, भाऊसाहेब वानखडे, रामेश्वर वाकोडे, विदर्भमहीलाउपाध्यक्ष आशाताई वानखेडे, विदर्भसचिव दलितमित्र विजय सपकाळ, जिल्हा संघटक प्रमुख इंजि.शरद खरात, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, महासचिव विजय साबळे, कार्यध्यक्ष प्रा. मुक्तार पठाण, सर्वश्रीतालुकाध्यक्ष बुलडाणा केशव सरकटे, मोताळा बाळासाहेब आहिरे, चिखली हीम्मतराव जाधव, सिंदखेडराजा भानुदास शेजूळ, रमेश पिंपळे, पत्रकार विजय भालमोडे, युवानेते महेंद्र साळवे, मेहकर राणा मोरे, राहूल आवसरमोल, मलकापूर दिलीप इंगळे, खामगाव महासचिव निळकंठ सोनोने, संग्रामपूर बाबूलाल इंगळे, जळगाव जामोद संतोष वानखडे, नांदुरा पत्रकार शैलेश वाकोडे, देऊळगाव राजा आकाश भैया साळवे, सुधीरदादा हिवाळे यांच्यासह जिल्हातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आणखी बातमी वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा https://mahadesha.com/
नियुक्तीनंतर रमेश अण्णा मुळे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्रात रिपाईचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार असून प्रत्येक समाजघटकाला न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय राहील.”येत्या काळात लवकरच मराठा दलीत ओबीसी मुस्लीम अल्पसंख्याक आघाडीची भव्य परिषद छत्रपती संभाजीनगर येथे होईल तेव्हा रिपाइं आठवलेंची ताकद महाराष्ट्रात दिसेल. ही नियुक्ती केवळ पदवाटप नसून राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
रमेश अण्णा मुळे पाटील यांच्या नियुक्ती मुळे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे व डॅा. रामदासजी आठवले यांनी योग्य मानसाची निवड केल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


