Met on Instagram, then kidnappe : इन्स्टाग्रामवर ओळख परिचय झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावामध्ये उघडकीस आली.
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नारेगावच्या कार्तिकवर गुन्हा
खामगाव : इन्स्टाग्रामवर ओळख परिचय झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावामध्ये उघडकीस आली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पळवून नेलेल्या पीडितेचे वय सतरा वर्षे सात महिने आहे. कार्तिक रामदास खरसन असे आरोपीचे नाव असून तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नारेगाव येथील रहिवासी आहे. १४ एप्रिल २०२६ च्या रात्री साडेनऊ वाजेच्या त्या अल्पवयीन मुलीस आरोपीने फूस लावून पळवून नेले. मुलगी दिसत नाही म्हणून आई-वडिलांसह नातेवाइकांनी शोधाशोध सुरू केली. घटनेनंतर संबंधित मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सव्वाचार वाजता खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.


