mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

त्या परप्रांतीय मजुराचा साथीदारानेच केला खून! : Migrant labourer murdered by accomplice

शेअर करा :

Migrant labourer murdered by accomplice : पिंपळगाव उंडाजवळ २९ एप्रिलच्या रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आलेल्या परप्रांतीय मजुराचा त्याच्या सहकाऱ्यानेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याचे समोर आले आहे.


Migrant labourer murdered by accomplice

जमीन व्यवस्थित मोजत नाही, धान्याची नासाडी करतो म्हणून केला वाद : आरोपीस अटक


आसिफ शाह


मेहकर : साखरखेर्डा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव उंडाजवळ २९ एप्रिलच्या रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आलेल्या परप्रांतीय मजुराचा त्याच्या सहकाऱ्यानेच खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याचे समोर आले आहे. साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड यांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवत अवघ्या काही तासांतच परप्रांतीय आरोपी मजूर साथीदाराला अटक केली.

पिंपळगाव उडा या ठिकाणी वनिता किशोर काटकर यांच्या शेतासमोर दत्तात्रय काशिनाथ देशमुख यांना टीनशेड भाड्याने दिले आहे. त्या ठिकाणी गहू, हरभरा व मका काढण्याचे काम हार्वेस्टिंगद्वारे करणारे परप्रांतीय मजूर वास्तव्याला असतात. २९ एप्रिलच्या रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास मयत करमजीत सिंग जनक सिंग (वय ५०) रा. साकीर कलान राज्य पंजाब व त्यांचे इतर साथीदार सोबत राहत होते. २९ एप्रिलच्या रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास मयत करमजीत सिंग व आरोपी बबलीसिंग सुखदेवसिंग रा. अकीलिया (पंजाब) यांचे गहू व मका हार्वेस्टिंग करताना तू बरोबर शेत मोजत नाही. गहू मका काढताना तू लक्ष देत नाही. यामुळे पिकाची नासाडी होते म्हणून दोघांमध्ये वाद झाला.

यातून आरोपी बबलीसिंग याने मृतकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून टाकून त्याला गंभीर जखमी गेले त्यातच त्याचा मृत्यू झाला. याची माहिती साखरखेर्डा पोलीस स्टेशनला कळताच ठाणेदार गजानन कारेवाड यांनी ताफा घेऊन घटनास्थळ गाठले व पंचनामा गेला. विशेष म्हणजे मृतदेह हा खाटेवर ठेवण्यात आला होता. हे पाहून वाटले पाहिजे की नैसर्गिक मृत्यू झाला. मात्र ठाणेदार गजानन कारेवाड यांनी घटनास्थळाचे निरीक्षण करून मृतदेह ताब्यात घेतला व सोबतच साथीदार मजुरांना सुद्धा तेथेच ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता बबलीसिंग सुखदेव सिंग या साथीदार मजुराने कबूल केले की मीच करमजीत सिंग याच्यासोबत झालेल्या भांडणात लोखंडी रॉडने हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हार्वेस्टर मालक हरिंदर सिंग इंद्रजीत सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top