mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

राजूरघाट जंगलाच्या आगीत वनसंपदा जळाली : Forest resources burnt in fire

शेअर करा :

 Forest resources burnt in fire : राजूर घाटातील जंगलास ३ मेच्या सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याने काही हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदा जळाली.


Forest resources burnt in fire

मोताळा : वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या राजूर घाटातील जंगलास ३ मेच्या सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याने काही हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदा जळाली. वनविभागाने शर्थीचे प्रयत्न करीत रात्री बारा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले.

मोताळा वनपरिक्षेत्रातील राजूर बिटमध्ये खैरखेड शिवारात कक्ष क्रमांक ३२८ मध्ये ३ मे रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच वनविभागाची एकच धावपळ उडाली. वनपाल, तीन वनरक्षक, सहा वनमजुरांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. रात्री अकरा वाजता ही आग विझविण्यात आली. या आगीची झळ वन्यजीव, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना प्रमाणात बसली. दोन हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. मात्र, हे नुकसान प्रत्यक्षात जास्त असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top