mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

फटाके फोडणाऱ्या बुलेटस्वारांना कारवाईचे फटके : Bullet riders hit for bursting firecrackers

शेअर करा :

Bullet riders hit for bursting firecrackers : दबंग, डॅशिंग, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेताच पोलिसिंगचा अंमल सुरू केला आहे. कर्णकर्कश आवाजात फटाके फोडत दुसऱ्यांच्या हृदयाला हादरविणाऱ्या बुलेटस्वारांना पाटील यांनी चांगलाच दणका दिला.


Bullet riders hit for bursting firecrackers

ठाणेदार संग्राम पाटील ॲक्शन मोडवर : हृदय थरथरवणारा आवाज करणाऱ्या सहा जणांना ५७ हजारांचा दंड


शरद माळोदे


बुलढाणा : दबंग, डॅशिंग, कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेताच पोलिसिंगचा अंमल सुरू केला आहे. कर्णकर्कश आवाजात फटाके फोडत दुसऱ्यांच्या हृदयाला हादरविणाऱ्या बुलेटस्वारांना पाटील यांनी चांगलाच दणका दिला. ५ मे रोजी केलेल्या कारवाईत मॉडीफाय सायलेन्सर बसविलेल्या सहा बुलेटधारकांवर कारवाई करीत धूमस्टाइल मोडीत काढायला सुरुवात केली. तर आरटीओ निरीक्षकांनी तपासणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने ५७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

बुलढाणा शहरच नव्हेतर जिल्हाभर ‘शान की सवारी’ म्हणून बुलेट वापरणाऱ्यांनी सामान्य लोकांचा वैताग वाढविल्याचे दिसत आहे. कंपनीकडून आलेले सायलेन्सर काढून मॉडीफाय सायलेन्सर लावून सुसाट वेगात या गाड्या पळविल्या जातात. फटाके फोडत धावणाऱ्या या गाड्यांमुळे दुसऱ्यांना मोठा त्रास होत आहे. बुलेटचा अंगाचा थरकाप उडविणारा आवाज पाहता बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी अशा वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेतली.

श्रीमंतीची शेखी मिरवणाऱ्या सहा जणांच्या बुलेट पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आल्या. यानंतर कोणकोणते वाहतूक नियम पायदळी तुडविले, याची तपासणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला पत्र देण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक विवेक भंडारे यांनी तपासणी केली असता दोष आढळले. त्यानुसार बुलेटधारकांना ५७ हजारांचा दंड आकारण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top