Shooting, Cycling and Athletics Selection Tests : आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर (राज्य निपुणता केंद्र) अंतर्गत शुटिंग, सायकलिंग व ॲथलेटिक्स या खेळांच्या निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत.

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत आयोजन
बुलढाणा : आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर (राज्य निपुणता केंद्र) अंतर्गत शुटिंग, सायकलिंग व ॲथलेटिक्स या खेळांच्या निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत.
१४ डिसेंबर २०२० रोजी मंजूर करण्यात आलेल्या या केंद्राअंतर्गत पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे ॲथलेटिक्स, शुटिंग आणि सायकलिंग या खेळांचे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
निवड चाचण्या ॲथलेटिक्स व सायकलिंगसाठी ११ व १२ मे २०२६ रोजी तर शुटिंगसाठी १८ व १९ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता घेण्यात येणार आहेत. या निवड प्रक्रियेसाठी पात्र खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रियेनुसार ॲथलेटिक्समध्ये १६ खेळाडू (०७ मुले व ०९ मुली), सायकलिंगमध्ये ०१ मुलगी आणि शुटिंगमध्ये १० खेळाडू (०६ मुले व ०४ मुली) यांची निवड करण्यात येणार आहे.
संबंधित खेळ प्रकारांमध्ये तज्ज्ञ समितीमार्फत खेळाडूंची चाचणी घेऊन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे.
निवड प्रक्रियेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत :
• ॲथलेटिक्स व सायकलिंग खेळासाठी राज्यस्तरीय प्राविण्यप्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभाग/प्राविण्य मिळविलेले खेळाडूच पात्र राहतील.
• खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत प्रवेशासाठी दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी निश्चित मानके लागू राहतील.
• इच्छुक खेळाडूंनी परिशिष्ट-ब व क नुसार माहिती अर्ज ०८ मे २०२६ पर्यंत kiscepune@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


