mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मजुराने मारला वायरच्या बंडलावर डल्ला; मध्य प्रदेशातून अटक : Laborer hits bundle of wire

शेअर करा :

Laborer hits bundle of wire : इमारत बांधकामावर काम करणारा मजूरच चोर निघाल्याची घटना समोर आली आहे. मजुराने इलेक्ट्रीक वायरचे दहा बंडल चोरणाऱ्या फरार आरोपी मजुरास बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली.


Laborer hits bundle of wire
मध्य प्रदेशातून अटक केलेला आरोपी

बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी पाळत ठेऊन केली अटक

बुलढाणा : इमारत बांधकामावर काम करणारा मजूरच चोर निघाल्याची घटना समोर आली आहे. मजुराने इलेक्ट्रीक वायरचे दहा बंडल चोरणाऱ्या फरार आरोपी मजुरास बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली.
शहरातील क्रीडा संकुल परिसरात राहणारे रविकुमार माताप्रसाद सोनकर यांनी बांधकाम सुरू केले होते. याठिकाणी रवी बलराम बारेला (रा. जामपाटी, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) हा बांधकामावर मजूर म्हणून कामाला होता. आरोपीने ३० एप्रिल रोजी दहा नग वायरची बंडले चोरून नेली. त्याची किंमत ७० हजार ६६ रुपये आहे. सोनकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तो मध्य प्रदेशातील आपले गाव जामपाटी येथे गेल्याचे समजते. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी पथक नेमले. पीएसआय समाधान वडणे, पोहेकॉ सुधीर मगर, पोलीस शिपाई नारायण गावडे यांचे पथक पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाले. जामपाटी पोहोचल्यावर आरोपीच्या हालचालीवरं बारकाईने लक्ष ठेऊन सापळा रचण्यात आला. अखेर आरोपीस गजाआड करण्यात आले. शेतातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

ही महत्त्वपूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👉

पंधरा वर्षांच्या मुलीने रोखला स्वतःचा बालविवाह! 

आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपीस एमसीआर देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुधीर मगर करीत आहेत.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख पीएसआय समाधान वडणे, पोहेकॉ सुधीर मगर, पोहेकॉ सुधीर मगर, महादेव इंगळे, पोहेकॉ सुनिता खंडारे, नारायण गावडे, गजानन राजपूत, तांत्रिक विश्लेषण विभागाचे ऋषी खंडेराव यांनी ही कारवाई केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top