mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

हळदीचे तीस क्विंटल बेणे पळविले : Thirty quintals of turmeric seeds were stolen

शेअर करा :

Thirty quintals of turmeric seeds were stolen : मेहकर : तालुक्यातील डोणगाव शिवारामध्ये गोठ्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे ३० क्विंटल हळदीचे बेणे चोरून नेले.


Thirty quintals of turmeric seeds were stolen

डोणगाव परिसरातील घटना

मेहकर : तालुक्यातील डोणगाव शिवारामध्ये गोठ्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे ३० क्विंटल हळदीचे बेणे चोरून नेले. ५ मे रोजी ही घटना उघडकीस आली.

डोणगाव येथील विठ्ठल विश्वनाथ भुतेकर यांनी लागवडीसाठी राजेश सावजी यांच्या मालकीच्या डोणगाव येथील गोठ्यामध्ये विकत आणलेले ३० क्विंटल हळदीचे बेणे साठवून ठेवले होते. ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते ५ मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी गोठ्याला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी ३० क्विंटल हळदीचे बेणे चोरून नेले. बाजार भाव किमतीनुसार प्रतिक्विंटल तीन हजार रुपये या दराप्रमाणे बेणे विकले जात आहे. ५ मे रोजी दुपारी या घटनेची फिर्याद डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३४ (१) आणि ३०५ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास हवालदार अरुण सानप हे करीत आहेत.

यापूर्वी हिवरा साबळे येथील गजानन साबळे या शेतकऱ्याच्या शेतातूनही हळदीचा बेणे चोरीला गेले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top