mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

राजर्षी शाहू कॉलेजची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम : Shahu College continues its tradition of 100 per cent results

शेअर करा :

Shahu College continues its tradition of 100 per cent results : बारावीच्या परीक्षेतील शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा देऊळघाट येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखली आहे.


बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

Shahu College continues its tradition of 100 per cent results

बुलढाणा : बारावीच्या परीक्षेतील शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा देऊळघाट येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या दैदिप्यमान यशामुळे कॉलेजचे नाव पुन्हा एकदा चमकले आहे.

तालुक्यातील देऊळघाट येथील राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात कला-वाणिज्य शाखेतून ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आणि विज्ञान शाखेतून ९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. कला-वाणिज्य शाखेतून समृद्धी जगताप ही विद्यार्थिनी ८९ टक्के गुण घेऊन प्रथम आली. वैष्णवी सुसर ही ८७ टक्के गुणांनी द्वितीय, पूजा दांडगे ८५ टक्के गुण संपादन करून तृतीय आली. तिच्यासोबतच वैष्णवी सोनटकर हीदेखील ८५ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

विज्ञान शाखेतून शाम शिंदे ९२.५० टक्के गुण घेऊन प्रथम आली. अल्झम बाबला ९२.१७ टक्के गुण घेऊन द्वितीय आणि ९१.६७ टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ९४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, प्राचार्य रवींद्र जाधव यांनी कौतूक

केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top