mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

स्टेट बँक कर्मचारी दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर : State Bank employees on nationwide strike

शेअर करा :

State Bank employees on nationwide strike : १६ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने (AISBISF) २५ व २६ मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील स्टेट बँकेच्या २२० हून अधिक शाखांतील सुमारे ८५० कर्मचारी व उपकर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.


State Bank employees on nationwide strike

२४ व २५ मी रोजी अमरावती विभागातील २२० शाखा राहणार बंद  

बुलढाणा : १६ मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने (AISBISF) २५ व २६ मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील स्टेट बँकेच्या २२० हून अधिक शाखांतील सुमारे ८५० कर्मचारी व उपकर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

२ मे रोजी एसबीआय अध्यक्षांना पाठविलेल्या नोटीसमध्ये फेडरेशनने औद्योगिक वाद कायदा १९४७ अंतर्गत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सार्वजनिक सुट्ट्या आल्यास संप २७ मेपर्यंत वाढविण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

२५ व २६ मे रोजी होणाऱ्या या संपामुळे २३ व २४ मेच्या सुट्ट्यांसह सलग चार दिवस बँक व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, इतर सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी बँका नियमितपणे सुरू राहतील.

फेडरेशनने १६ मागण्या सादर केल्या असून, कामगारांचे हक्क पद्धतशीरपणे हिरावले जात आहेत. अनेक दशकांच्या संघर्षातून मिळालेले संरक्षण कमी केले जात आहे, करार केवळ औपचारिकता बनले आहेत आणि विरोधी मतांना दुय्यम स्थान दिले जात आहे, असे AISBISF ने म्हटले आहे.

वारंवार चर्चा, निवेदने आणि प्रामाणिक प्रयत्न करूनही व्यवस्थापनाने उदासीनतेची भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे संपाचे आवाहन करावे लागत आहे, असे संघटनेचे विभागीय सचिव अविनाश बोचरे यांनी सांगितले.

जाणून घ्या अपहरणाचे विद्यार्थ्याने कसे घडवले नाट्य पुढील लिंकवर👉

अपहरणाचा बनाव रचून बापाला मागितले ४० तोळे सोने!

कर्मचारी संघटनेने सेवा अटी सुधारण्यासाठी आणि कामकाजातील संतुलन पुनर्स्थापित करण्यासाठी १६ मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये शाखांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी मेसेंजर आणि सशस्त्र सुरक्षा रक्षकांची भरती करण्याची मागणीही समाविष्ट आहे.

अमरावती विभागातील संघटनेचे प्रतिनिधित्व मंगेश दुबळे, अभिजीत टाले, अविनाश बोचरे, मोहनीश ठाकरे, नितीन दांदळे, योगेश कातखेडे, सागर अनासाने, अजय येवतकर आणि इतर पदाधिकाऱ्यांचा यांच्याकडे आहे.

 

अशा आहेत मागण्या

मेसेंजर पदांची भरती

सशस्त्र सुरक्षा रक्षकांची भरती

कर्मचाऱ्यांना पेन्शन फंड मॅनेजर बदलण्याचा पर्याय द्यावा

2019 पासून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना इंटर सर्कल बदली द्यावी

कायमस्वरूपी कामांचे आउटसोर्सिग बंद करावे

पुरेशा कर्मचाऱ्यांची भरती करावी

स्टेट बँक ऑफ इंडियामधील वेतन समता प्रश्न सोडवावा

करिअर प्रगती योजनेचा आढावा घ्यावा

दहाव्या द्विपक्षीय करारातील निवृत्त कर्मचाऱ्यांना काल्पनिक आठवी स्थगिती वेतनवाढ द्यावी

15.07.2024 पासून डॉक्टर सल्ला शुल्क लागू करावे

वैद्यकीय परतावा योजनेत सुधारणा करावी

सातव्या द्विपक्षीय करारातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये निवृत्तीपासून सर्व वेतन घटक समाविष्ट करावेत

HRMS संबंधित समस्या सोडवाव्यात

कामगार कर्मचारी संचालकाची नियुक्ती करावी

PF विश्वस्त नामनिर्देशित सदस्याची नियुक्ती करावी

क्रॉस-सेलिंगच्या नावाखाली होणारी चुकीची विक्री थांबवावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top