Blood donation camp on the 12th anniversary of Dr. Arun Khasbage : बुलढाणा येथे दिवंगत डॉ. अरुण नथुराव खासबागे यांच्या बाराव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम व रक्तदान शिबिर पार पडले.

बुलढाणा : दिवंगत डॉ. अरुण नथुराव खासबागे यांच्या बाराव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम व रक्तदान शिबिर ६ मे बुधवार रोजी डॉ. खासबागे मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक येथे पार पडले.
याप्रसंगी भरत बिल्लारी, दिलीपराव निकम, आशिष व्यवहारे, चंद्रशेखर जोशी व रामकृष्ण भराड यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास दलित मित्र माधवराव हुडेकर, डॉ. चंद्रशेखर उमाळे, बी.एन. काळवाघे, सुरेंद्र लहासे, भीमराव चव्हांड, पत्रकार हर्षनंदन वाघ, राहुल चव्हाण, संतोषकुमार ब्रह्मपुरीकर, शेजोळ, सौ. शेजोळ, सौ. उमाळे, डॉ. नेहा उमाळे, डॉ. चैतन्य जाधव, डॉ. आशिष मुळे, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. राहुल मेहेत्रे, डॉ. गजेंद्र निकम, डॉ. दुर्गासिंग जाधव, मस्के, जाधव, शिवाजीराव गवई, दौलतराव नरवाडे, डी.एन. पाटील, प्रा. प्रेम खासबागे, प्रा. सुचेता खासबागे, डॉ. वर्षा खासबागे, डॉ. आशिष खासबागे, आर्यन खासबागे, कबीर खासबागे, जबिन फिरदोस, ऐफाज रहमान उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जीवनधारा ब्लड बँकेचे महेश भाक्कड, संदीप तोरमळ, अनिल जाधव व सतीश झिने यांचे सहकार्य लाभले.


