Police beat up birthday boy : आपल्या मित्राचा वाढदिवस यादगार ठरवण्यासाठी हौशी तरुणांनी केलेला उपद्रव त्यांच्या चांगलाच अंगलट आला. सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

दोन तरुणांना अटक
बुलढाणा : आपल्या मित्राचा वाढदिवस यादगार ठरवण्यासाठी हौशी तरुणांनी केलेला उपद्रव त्यांच्या चांगलाच अंगलट आला. सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ही माहिती पोलिसांपर्यंत गेल्यानंतर बर्थडे बॉयसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मोताळा तालुक्यातील वाघजाळ येथील राहुल गजानन वाघ याचा ७ मी रोजी वाढदिवस होता. वाघजाळ फाट्यावर सार्वजनिक ठिकाणी रात्री साडेनऊ वाजता वाढदिवस साजरा करताना राहुलचा मित्र डमरु ऊर्फ करण धोंडू चव्हाण (रा. नेहरुनगर) यांच्यासह हातात टोकदार व धारदार तलवार घेऊन केक कापला. त्याचा व्हिडीओ तयार करून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होण्याच्या उदेशाने सोशल मीडियावर प्रसारित केला. सार्वजनिक ठिकाणी शस्त्राचे प्रदर्शन करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ४/२५, ७/२५ भारतीय शस्त्रअधिनियम सहकलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी राहुल गजानन वाघ व डमरु ऊर्फ करण धोंडु चव्हाण यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून एमएच – १२ – एनयू -१३०३ क्रमांकाची कार, दोन मोबाइल फोन व एक तलवार जप्त करण्यात आली.


