mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जागतिक रेड क्रॉस दिन; इंडियन रेड क्रॉस कार्यालयावर ध्वजारोहण : Flag hoisting at the Red Cross office

शेअर करा :

Flag hoisting at the Red Cross office :रेड क्रॉस सोसायटी चे संस्थापक हेन्री ड्युनांट यांचा जन्म दिवसानिमित्त ८ मे ला जागतिक रेड क्रॉस दिनी इंडियन रेड क्रॉस शाखा, बुलडाणा च्या कार्यालयावर इंडियन रेड क्रास शाखेचे व्हाँईस चेअरमन ॲड. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.Flag hoisting at the Red Cross office Flag hoisting at the Red Cross office

बुलढाणा : रेड क्रॉस सोसायटी चे संस्थापक हेन्री ड्युनांट यांचा जन्म दिवसानिमित्त ८ मे ला जागतिक रेड क्रॉस दिनी इंडियन रेड क्रॉस शाखा, बुलडाणा च्या कार्यालयावर इंडियन रेड क्रास शाखेचे व्हाँईस चेअरमन ॲड. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इंडियन रेडक्रास सोसायटी बुलडाणा शाखेचे चेअरमन डॉ. विनोद जवरे यांच्या सह शाखा सचिव प्रा. गोपालसिंग राजपूत, संचालक तथा पत्रकार गणेश उबरहंडे, संचालक सुनील धंदर पाटील, संदीप गावंडे, लहासे, सोनोने आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

रेड क्रॉस ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्था असून, युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि आणीबाणीच्या वेळी जखमी व गरजू लोकांना भेदभावविरहित मदत करते. १८६३ मध्ये हेन्री ड्युनांट यांनी याची स्थापना केली. ८ मे रोजी ‘जागतिक रेड क्रॉस दिन’ साजरा केला जातो.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय क्षयरोग रूग्णालय परिसरात इंडियन रेडक्रास शाखा बुलडाणा कार्यालयासमोर ८ मे सकाळी ठिक ८ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते रेडक्रास चे संस्थापक हेन्री ड्युनांट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. इंडियन रेड क्रॉस शाखा बुलडाणा ची विद्यमान जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

आणखी बातम्या वाचण्यासाठी या link वर क्लिक करा https://mahadesha.com/

यावेळी डॉ. विनोद जवरे व अँड. जयसिंगराव देशमुख यांनी व्हेन्ड्री डूनाँट यांच्या व रेडक्रास कार्यावर प्रकाश टाकला.त्याचप्रमाणे इंडियन रेडक्रास शाखा, बुलडाणा च्या वतीने राबविण्यात येणारे वृक्षारोपण,रक्तदान, ऑक्सीजन मीटर चे वाटप, क्रीडा स्पर्धकांना पाणी पाऊच चे वाटप,आरोग्य शिबीर तसेच गरजू व आर्थिक दुर्बल रुग्णांना अत्यल्प दरात बेड, ऑक्सिजन मशीन पुरवणे बाबत माहिती दिली. तसेच भविष्यात रेडक्रॉस च्या उपक्रमाबाबतही मान्यवरांनी यावेळी अवगत केले. यावेळी भारताचा तिरंगा ध्वज एडवोकेट जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते फडकविल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top