debt crisis; The farmer ended his life : अल्पभूधारक शेतकऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० मे रोजी सकाळी राहेरी येथे उघडकीस आली.

मोताळा : खासगी पतसंस्थेच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या राहेरी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. १० मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
बबन देविदास जाधव (वय ४६) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून या जगातून कायम निरोप घेतला. मोताळा तालुक्यातील राहेरी येथील रहिवासी बबन जाधव हे अल्पभूधारक शेतकरी होते. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी पतसंस्थेसह इतर असे सुमारे पाच लाख रुपयांचे त्यांच्याकडे कर्ज होते. वाढत्या आर्थिक तणावामुळे त्यांनी गावाजवळील तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. रविवार, १० मे रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
शेतकरी आत्महत्येने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.


