mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

महात्मा गांधी महाविद्यालयाच्या साक्षी सास्तेचे निबंध व कविता लेखन स्पर्धेत देदीप्यमान यश : Sakshi Saste of Mahatma Gandhi College Achieves Resounding Success in Essay and Poetry Writing Competition

शेअर करा :

Sakshi Saste of Mahatma Gandhi College Achieves Resounding Success in Essay and Poetry Writing Competition : महात्मा गांधी महाविद्यालयाच्या साक्षी सास्तेचे निबंध व कविता लेखन स्पर्धेत देदीप्यमान यश

Sakshi Saste of Mahatma Gandhi College Achieves Resounding Success in Essay and Poetry Writing Competition


बुलढाणा प्रतिनिधी : 

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या निबंध व कविता लेखन स्पर्धेत महात्मा गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साक्षी सास्ते हिने प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. दि. १० ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

एम.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या कु. साक्षी सास्ते हिने आपल्या प्रभावी लेखनशैली, समाजाविषयीची सखोल जाण आणि विचारांची उत्कृष्ट मांडणी यांच्या बळावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या लक्षणीय कामगिरीमुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धेत सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व, संविधानिक मूल्ये, मानवता आणि सामाजिक परिवर्तन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कु. साक्षी सास्ते हिने आपल्या लेखनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रभावीपणे विश्लेषण करत सामाजिक समतेचा संदेश दिला. तिच्या लेखनातील वैचारिक परिपक्वता आणि आशयाची प्रभावी मांडणी यामुळे परीक्षकांनी तिच्या साहित्यकृतीची विशेष दखल घेऊन तिला प्रथम क्रमांकासाठी निवडले. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. जयवंत चौधरी यांनीही साक्षीच्या या यशाबद्दल तिचे कौतुक केले आहे.

या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राध्यापकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी कु. साक्षी सास्ते हिचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी यावेळी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे, तर साहित्य, कला आणि सामाजिक विषयांमध्येही सक्रिय सहभाग घेण्यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असते.

आणखी बातम्या वाचण्यासाठी खालील जिंकला क्लिक करा https://mahadesha.com/

कु. साक्षी सास्ते हिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेत एक नवा मानाचा तुरा खोवला गेला आहे. भविष्यातही विद्यार्थी अशाच प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. हे यश केवळ साक्षीचे नसून, ते महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top