Self-immolation attempt : जुन्या सरकारी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीकडे होणारे दुर्लक्ष पाहता शिवसेने (उबाठा) च्या दोन पदाधिकाऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच पकडल्यामुळे अनर्थ टळाला.

मोताळा : जुन्या सरकारी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीकडे होणारे दुर्लक्ष पाहता शिवसेने (उबाठा) च्या दोन पदाधिकाऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच पकडल्यामुळे अनर्थ टळाला.
मोताळा तालुक्यातील शेलापूर–सांगळद शेतरस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रशासन काहीच हालचाली करत नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे व गणेश घाटे हे प्रजासत्ताक दिनी सकाळी तहसील कार्यालयात पोहोचले. अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याच्या तयारीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्या जवळील पेट्रोलची बॉटल हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला. या घटनेमुळे बराच वेळ गोंधळ उडाला होता. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा त्रास असावा लागत आहे. पिंपळपाटी येथील शेलापूर ते सांगळद या सरकारी जुन्या रस्त्याचे सीमांकन करूण अतिक्रमण हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


