RTE admission process for 25 percent waiting list children begins : आरटीई अर्थात शिक्षण हक्क अधिनियमानुसार सन २९२६-२७ या वर्षाच्या दुर्बल व वंचित घटकातील २५ टक्के आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र.०१ मधील प्रवेश पात्र बालकांची प्रवेश प्रक्रीया १५ ते २३ मे या कालावधीत होणार आहे.

बुलढाणा : आरटीई अर्थात शिक्षण हक्क अधिनियमानुसार सन २९२६-२७ या वर्षाच्या दुर्बल व वंचित घटकातील २५ टक्के आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र.०१ मधील प्रवेश पात्र बालकांची प्रवेश प्रक्रीया १५ ते २३ मे या कालावधीत होणार आहे. दरम्यान यासाठी प्रतिक्षा यादीतील मुलांच्या पालकांना १५ मे पासून एसएमएस सुरू झाले असून २३ मे पर्यंत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे . जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेत रिक्त असलेल्या ४३० जागांवर यातून प्रवेश दिले जाणार आहेत.
आणखी बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👉
https://mahadesha.com/
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन सोडत ६ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. दोन वेळा मुदत वाढ देवून देखील ८ मे पर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील ४३० जागा रिक्त राहिल्या आहेत. सदर जागांसाठी प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसारच एसएमएस पाठविण्यात येत आहेत . तथापि पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर ‘अर्जाची स्थिती’या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. २३ मे पर्यंत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली असून प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी त्यांच्या अलोटमेन्ट लेटरची प्रिंट काढून अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत आपले तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून १५ ते २३ मे या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावी. तसेच आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे. तालुका निहाय रिक्त जागांचा तपशील सोबत देण्यात आला आहे.



