mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

डोणगाव येथे २९ मे रोजी मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप शिबिर : Free medical check-up and medicine distribution camp at Dongaon on May 29

शेअर करा :

Free medical check-up and medicine distribution camp at Dongaon on May 29 : मुंबई येथील सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल सावजी यांच्या वाढदिवसानिमित्त डोणगाव येथे सामाजिक दृष्टिकोनातून मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


Free medical check-up and medicine distribution camp at Dongaon on May 29

औचित्य डॉ. राहुल सावजी यांच्या वाढदिवसाचे

डोणगाव : मुंबई येथील सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल सुबोध सावजी यांच्या वाढदिवसानिमित्त डोणगाव येथे एका सामाजिक दृष्टिकोनातून प्रेरित मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील श्री विष्णू बालकृष्ण सावजी मंगल कार्यालय येथे हे शिबिर भरवण्यात येणार आहे. या शिबिरात मोफत रुग्ण तपासणी, इंजेक्शन आणि आवश्यक औषधे वाटप करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमात अनुभवी डॉक्टरांच्या टीमकडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल. गरजू रुग्णांसाठी कॉट, व्हीलचेअर, वॉकर, एअर बेड इत्यादी वैद्यकीय सहाय्यक उपकरणे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सुबोध युवक कल्याण मंडळ यांच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमामागे डॉ. राहुल सावजी यांचा समाजसेवेचा हेतू स्पष्ट दिसतो. विशेषतः ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डोणगाव व परिसरातील

सर्व नागरिकांनी सकाळी ८ ते ११ दरम्यान या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

  1. अधिकाधिक बातम्या वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा👍 https://अध mahadesha.com/

मुंबईत समाजसेवी उपक्रम

डॉ. राहुल सावजी हे सपना सोबत सावजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरिबांसाठी योगदान दिले आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्या सामाजिक कार्याचा वसा डॉक्टर राहुल यांनी जोपासला आहे. वडिलांच्या शिकवणीनुसार त्यांनी गावाशी कधीच नाळ तुटू दिली नाही. गावकऱ्यांच्या प्रेमाखातर आणि सेवा करण्याच्या बांधिलकीतून हे शिबिर आयोजित केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top