Checking for drunk drivers on Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मद्यपी चालकांची महामार्ग पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत तपासणी सुरू केली आहे. प्रत्येक इंटरचेंजवर ही तपासणी केली जात आहे. सोबतच वाहनांचे टायर तसेच वाहनाची स्थिती तपासली जात आहे.

महामार्ग पोलिसांनी राबविली ड्रंक अँड ड्राइव्ह टेस्ट : दारू पिलेला आढळल्यास मार्गावर जाण्यास मज्जाव
आसिफ शाह
मेहकर : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मद्यपी चालकांची महामार्ग पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत तपासणी सुरू केली आहे. प्रत्येक इंटरचेंजवर ही तपासणी केली जात आहे. सोबतच वाहनांचे टायर तसेच वाहनाची स्थिती तपासली जात आहे. तसेच समृद्धी महामार्गावर प्रवास करताना काय काळजी घ्यावी याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे.
माने हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान; डॉ. विवेक माने व महिला डॉक्टरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल👉
https://mahadesha.com/fetal-gender-diagnosis-at-mane-hospital
sनागपूर येथील समृद्धी महामार्गचे पोलीस अधीक्षक रोहित मतानी यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक इंटरचेंजवर ड्रंक अँड ड्राइव्हने होणारे अपघात टाळण्यासाठी ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. वाहनाचा चालक दारू पिलेला आहे काय, याची तपासणी केली जात आहे. यासाठी ब्रेथलायझर यंत्र वापरले जात आहे. जाणार असून ‘ब्रेथ अनॅलिसिस टेस्ट’ ( ‘ड्रंक अँड ड्राइव्ह टेस्ट’) घेतली जाणार आहे या टेस्टमध्ये जे पॉझिटिव्ह येतील त्यांना समृद्धीवर जाण्यास मज्जाव केला जात आहे. तसेच तळीराम चालकावर नियमानुसार कारवाई होणार आहे. याव्यतिरिक्त महामार्ग पोलीस प्रशासनाकडून चालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सोबतच कोणती लेन कशासाठी वापरण्यात यावी, इमर्जन्सी वापर कधी करावा, याची माहिती दिली जाते. मागील तीन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या फरदापूर, दुसरबीड व सिंदखेडराजा इंटरचेंजवर ३१ मे रोजी दुपारपासून रात्री अकरा वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.
लहान मोठ्या वाहन चालकांच्या अल्कोहोल चाचण्या घेण्यात आल्या. या मोहिमेत पोलीस निरीक्षक इंगळे, पीएसआय अरविंद किरणकर, एएसआय मंगेश खडसे, पोलिस शिपाई धीरज चंदन, नीलेश राठोड, आकाश यादव, इरफान शेख, मंगेश तोतरे यांनी सहभाग घेतला.


