संस्थेने साधली शैक्षणिक प्रगती
२०११ साली कॉन्व्हेंटपासून शाळेची सुरुवात झाली. पंधरा वर्षांच्या काळात संस्थेने मोठी शैक्षणिक प्रगती साध्य केली. आजघडीला कॉन्व्हेंट आणि पहिलीपासून ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्या १ हजार ८७३ विद्यार्थी शिक्षणाचे धडे येथे गिरवत आहेत. तज्ञ शिक्षक चांगले विद्यार्थी घडवत असल्याचा हा परिणाम असून संस्थेचे नाव पंचक्रोशीत आदराने घेतले जात आहे.