mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भरली आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा : A school for tribal students was held on the Zilla Parishad premises.

शेअर करा :

A school for tribal students was held on the Zilla Parishad premises. : जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भरली आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा

A school for tribal students was held on the Zilla Parishad premises.


सीईओ गुलाबराव खरात यांनी तातडीने केली सहा शिक्षकांची नियुक्ती 

 बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी भिंगारा गावातील जिल्हा परिषदेच्या निवासी शाळेसह चाळीस टापरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता पालकांनी विद्यार्थ्यांना २० जुलै रोजी थेट जिल्हा परिषदेत आणून शाळा भरविली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी तातडीने सहा शिक्षकांची नियुक्ती केली.

A school for tribal students was held on the Zilla Parishad premises.

 भिंगारा येथे पहिली ते दहावीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत सहाव्या वर्गापासून दहावीपर्यंत सात शिक्षकांची गरज होती. परंतु गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांची सर्वच पदे रिक्त होती. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत चालले होते. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षक दिले जात नव्हते, असा आरोप जय आदिवासी संघटनेचे राधेश्याम खरात यांनी केला. एक तर आदिवासी दुर्गम भाग, त्यात कुणीच शाळेकडे लक्ष द्यायला तयार नाही. संयम ढळल्याने राधेश्याम खरात, देवीदास डावर, नंदु सोळंकी यांच्यासह पालकांनी सोमवारी थेट ७५ हून अधिक विद्यार्थ्यांना बुलढाणा येथे आणून जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शाळा भरविली. शिक्षक दिले जात नाहीत, तोपर्यंत जागचे हलणार नाही, असा पवित्रा घेतला.

 

दरम्यान, शिक्षणाच्या बाबतीत संवेदनशील असलेले व ‘मिशन झेड’च्या माध्यमातून गोरगरिबांच्या शंभर मुलांना डॉक्टर, इंजिनीअरसारख्या क्षेत्रात उतरण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने ५० लाखांची तरतूद करणारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. स्वत: विद्यार्थी व पालकांपर्यंत येऊन त्यांनी चर्चा केली. शिक्षण विभागाला तातडीने भिंगारा गावासाठी पाच शिक्षकांच्या नेमणुकीचे आदेश दिले. काही तासांतच पालकांच्या हाती शिक्षकांचे नियुक्तीपत्र सीईओंनी दिले. त्याचप्रमाणे चाळीसटापरी येथील पहिली ते पाचवीसाठी एकच शिक्षक होता. ५८ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकांची गरज होती. तेथेही एका शिक्षकाची तत्काळ नियुक्ती करण्यात आली.

निवासी शाळेत ३४२ विद्यार्थी

राधेश्याम खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंगारा येथे जिल्हा परिषदेची निवासी शाळा आहे. पहिली ते दहावीपर्यंत सुभाषचंद्र बोस निवासी वसतिगृहात राहून ३४२ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत पाच शिक्षक होते. त्यातील मुख्याध्यापक व अधीक्षकाची बदली झाल्यानंतर त्यांची पदे रिक्त झाली. तर पुढे सहावी ते दहावीपर्यंत शिक्षकांची सात पदे रिक्त होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सीईओ गुलाबराव खरात यांनी सहावी ते दहावीकरिता पाच शिक्षकांची नियुक्ती केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top