mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

धाड येथे बंद पाळून अजितदादांना आदरांजली : Paying homage to Dada by observing a bandh

शेअर करा :

Paying homage to Dada by observing a bandh : धाड येथे कडकडीत बंद पाळून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सर्व पक्षीयांकडून शोकसंवेदना
धाड : विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. धाड येथे गुरुवार, २९ जानेवारी रोजी सर्व पक्षांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने बंद पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेऊन अजितदादा यांच्याप्रति असलेले प्रेम व्यक्त करण्यात आले. गावातील व्यापाऱ्यांनी दुखवटा पाळून अजितदादा यांच्या स्मृतींना अभिवादन केले. डॉक्टर्स, मेडिकल, पॅथॉलॉजी असोसिएशनच्या वतीने देखील अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top