mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

महिलेच्या गर्भपिशवीतून काढला सहा किलोचा गोळा : Six-kilogram ball removed from woman’s womb

शेअर करा :

Six-kilogram ball removed from woman’s womb : महिला रुग्णालयातील डॉक्टरांनी किचकट शस्त्रक्रिया यशस्वी करून एका रुग्ण महिलेच्या गर्भपिशवीतील तब्बल सहा किलो वजनाचा मांसाचा गोळा यशस्वीरित्या काढला.

Six-kilogram ball removed from woman's womb

स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले जीवदान

बुलढाणा : जिल्हा महिला रुग्णालयातील डॉक्टरांनी आणखी एक किचकट शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्ण महिलेस जीवदान दिले. या महिलेच्या गर्भपिशवीतील तब्बल सहा किलो वजनाचा मांसाचा गोळा यशस्वीरित्या काढण्यात आला.

जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये ही महिला उपचारासाठी आली होती. तिच्या पोटात सहा किलोचा गर्भपिशवी (Fibroid) चा गोळा असल्याचे निदान झाले होते. २९ जानेवारीला महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

वर्षभरापासून ही महिला पोटदुखीने त्रस्त होती. वेगवेगळ्या डॉक्टरांकडे उपचार करूनही फरक पडत नव्हता. योग्य निदानही होत नसल्याने महिलेसोबतच तिचे कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, महिलेला नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आणण्यात आले. सोनोग्राफी केली असता पोटामध्ये मोठा मांसाचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्त्री विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष वानखेडे, डॉ. संजीवनी वानरे, डॉ. योगेश शिंदे यांनी भूलतज्ञ डॉ. प्रियंका पाटील अधिसेविका उजाडे, परिसेविका छाया पांडे, अमित किन्हीकर, दीपाली बिबे, आम्रपाली आरख, सुनीता मंजुळ यांच्या मदतीने हा गोळा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला.

दोन सीझर झाल्याने होते आव्हान

आधीचे दोन सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. तसेच B-ve हे दुर्मिळ रक्त गट होता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया योग्य रीतीने पार पाडून तब्बल सहा किलोचा गर्भपिशवीमधील गोळा (Fibroid) स्त्रीच्या पोटातून काढला काढण्यात आला. शुभम मोहटे, सूरज हिवाळे, सुलभा आव्हाड यांनीही यावेळी मदत केली.

टीम वानखेडेचे दुहेरी यश

यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी  डॉ. संतोष वानखेडे यांनी स्त्री रुग्णालयातच साडेचार किलोचा मांसाचा गोळा एका महिलेच्या पोटातून काढला होता. आज त्यापेक्षाही मोठा सहा किलोचा मांसाचा गोळा काढण्यात डॉ. संतोष वानखेडे व त्यांची टीम यशस्वी ठरली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top