mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

ढाब्यावर राडा; मारहाण, तोडफोड : Rage at dhaba; beating, vandalism

शेअर करा :

Rage at dhaba; beating, vandalism : मूर्ती फाट्यावर आनंद सागर ढाब्यावर टोळक्याने हल्ला केला. मारहाण, तोडफोड झाली. तर ढाबामालकासह कामगारांनीदेखील मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली. हा राडा घातल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

Rage at dhaba; beating, vandalism
हल्लेखोरांनी केलेली तोडफोड

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील मूर्ती फाट्यावरील आनंद सागर ढाब्यावर २९ जानेवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास राडा झाला. काही जणांनी ढाबामालक व त्याच्या मुलास लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच तोडफोड करण्यात आली. तर प्रत्युत्तरात हल्ला करणाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
बुलढाणा ते मलकापूर मार्गावर मूर्ती फाट्याजवळ मोताळा तालुक्यातील कोथळी येथील हसन शाह उमर शाह (वय ३०) याचा आनंद सागर नावाने ढाबा आहे. २९ जानेवारीच्या रात्री साडेआठ वाजता नेहरुनगर येथील योगेश चव्हाण व हर्षल पवार या दोघांनी लोखंडी रॉड हातात घेऊन काऊंटरमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. विरोध केला असता योगेश चव्हाण याने हसनच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारला. तसेच योगेश चव्हाण व हर्षल पवार यांनी हसनच्या वडिलांनाही मारहाण केली तसेच आरोपी योगेशच्या भावाने टेबल, खुर्च्या आणि काउंटरची तोडफोड केली. अशा तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले.

Rage at dhaba; beating, vandalism

तर दुसऱ्या गटातील योगेश गोपीचंद चव्हाण (वय २५) यानेही पोलिसांत तक्रार दिली. जेवण करण्यासाठी गेल्यानंतर तेथील कामगारांनी जेवण देत नाही म्हटले तसेच लोटपाट करून शिविगाळ केली. तसेच मारहाण करण्यात आली. या तक्रारीवरून ढाबामालक व दोन कामगार अशा तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top