mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

आता पती-पत्नीत भांडण होणारच नाही! : Now there will be no more fights between husband and wife!

शेअर करा :

Now there will be no more fights between husband and wife! : पती-पत्नीमध्ये काही कारणांनी झालेले वाद अगदीच विकोपाला जाऊन दोघांचा संसार तुटतो. कधी कधी तर क्षुल्लक कारण दोघांच्या ताटातुटीला कारणीभूत ठरते. सर्व समाजामध्ये नवरा-बायकोच्या भांडणाची अनेक प्रकरणे समोर येतात. कोर्ट, कचेऱ्यांमध्ये वेळ जातो. सुखी संसाराला गालबोट लागून फारकतीपर्यंत प्रकरण येते. मात्र, मराठा समाजात पती-पत्नीमध्ये झालेले भांडण कोर्टाऐवजी मराठा पंचायतीमध्ये मिटविले जाणार आहे.

मराठा पंचायत मिटवणार वाद : छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचा पुढाकार

बुलढाणा : पती-पत्नीमध्ये काही कारणांनी झालेले वाद अगदीच विकोपाला जाऊन दोघांचा संसार तुटतो. कधी कधी तर क्षुल्लक कारण दोघांच्या ताटातुटीला कारणीभूत ठरते. सर्व समाजामध्ये नवरा-बायकोच्या भांडणाची अनेक प्रकरणे समोर येतात. कोर्ट, कचेऱ्यांमध्ये वेळ जातो. सुखी संसाराला गालबोट लागून फारकतीपर्यंत प्रकरण येते. मात्र, मराठा समाजात पती-पत्नीमध्ये झालेले भांडण कोर्टाऐवजी मराठा पंचायतीमध्ये मिटविले जाणार आहे. काहीही झाले तरी संसार सुरळीत सुरू राहील आणि दोघांचे कलूषित झालेली मने जोडण्याचे काम ही पंचायत करणार आहे.

मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि अकोट येथील संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ यांच्यावतीने मराठा पंचायत ही समिती स्थापन्यात आली आहे. बऱ्याच कुटुंबांमध्ये वादविवाद होऊन पती-पत्नी विभक्त होण्याचा प्रयत्न करतात. पटत नसल्याने त्यांच्यातील वाद कोर्टात नेला जातो. तेथे पैसा, श्रम आणि वेळ वाया जातो. याशिवाय डोक्याला मानसिक ताणही वाढतो. दोघा पती-पत्नीमध्येच नव्हे तर माहेर आणि  सासर या दोन्ही कुटुंबांनादेखील मनस्ताप सहन करावा लागतो. अपत्ये झाली तर अशा स्थितीत त्यांची आबाळ होते. कुटुंबाची होणारी वाताहत थांबवून पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी ही पंचायत काम करणार आहे. पती-पत्नीमधील नाते तुटूच नये, यासाठी समिती सामंजस्याने आणि समुपदेशनाने पती-पत्नीमधील वाद मिटविणार आहे. मराठा समाजाने घेतलेला हा निर्णय स्तुत्य असून त्याचे स्वागत केले जात आहे.
अध्यक्ष आणि सदस्य
मराठा पंचायत समितीच्या अध्यक्षपदी दिलीप देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. सचिव म्हणून साहेबराव मोरे काम पाहतील. हरिभाऊ भगत, ज्ञानदेव हिवाळे, प्रकाश पाटील, सदाशिव भोईटे, सोपान शेलकर, निवृत्ती फरफट हे या समितीत सदस्य आहेत. पती-पत्नीने वाद उद्भवल्यास कोर्टाची पायरी न चढता पंचायतीमध्ये अर्ज करून तुटण्याच्या मार्गावर आलेला संसार जुळवावा, असे आवाहन पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
तुटण्यापासून वाचविला दोघांचा संसार 
ज्या उद्देशाने मराठा पंचायत समिती स्थापन करण्यात आली, त्याचा हेतू पहिल्याच दिवशी साध्य झाला. एका जोडप्याचे प्रकरण ठेवले असता दोघांची समजूत काढत विभक्तीच्या मार्गावर असलेले त्यांचे नाते समितीने तुटण्यापासून रोखले.
न्यायालयातील प्रकरणेही हाताळणार
सद्यस्थितीत न्यायालयात सुरू असलेली प्रकरणेही ही समिती हाताळून बाहेर आपसातील वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top