‘Caesar Na Zalelya Kavita’ collection wins 17th state-level award : मेहकर येथील कवी डॉ. सुनील श्रीराम पवार यांच्या बहुचर्चित ‘सिझर न झालेल्या कविता’ संग्रहाला आणखी एका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. सुनील पवार यांच्या कविता संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
बुलढाणा : मेहकर येथील कवी डॉ. सुनील श्रीराम पवार यांच्या बहुचर्चित ‘सिझर न झालेल्या कविता’ संग्रहाला आणखी एका राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील ‘मराठी भाषा संवर्धन’ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुरस्कार सोहळा रविवारी वणीत संपन्न झाला.
याप्रसंगी डॉ. सुनील पवार यांना रोख रक्कम, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ. सुनील पवार यांच्या ‘सिझर न झालेल्या कविता’ संग्रहाला हा सतरावा राज्यस्तरीय पुरस्कार असून यापूर्वी त्यांच्या कवितेचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. तसेच महाराष्ट्रातील तेहतीस नामवंत साहित्यिकांनी ‘सिझर न झालेल्या कविता’ संग्रहावर समीक्षालेख लिहले आहेत. त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीची दखल घेऊन त्यांना कवितेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी साहित्यपिठावर संस्थेचे अध्यक्ष सुरेश पेंढरवाड, कार्यध्यक्ष नागोराव कोम्पलवार, सचिव गणेश बुटे, साहित्यिक डॉ. अनंता सूर, उपाध्यक्ष लक्ष्मण काकरवार, उदयराव गोहोकार, रामदाम बोढे, सहायक पोलीस आयुक्त रामदास रेवते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पेंढरवाड यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण ठेंगणे यांनी केले. यावेळी संस्थेचे सर्व सदस्य, शहरातील रसिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी अनामिका पेंढरवाड, उमाकांत तीपर्तीवार, संदीप डहाके, संतोष बर्लावार, संदीप ठाकरे, विस्तार अधिकारी रमेश बोबडे, प्रा. विजय पराते, निशांत कपाट यांनी परिश्रम घेतले.

